उद्यापासून(15 सप्टेंबर) भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात टी20 मालिकेला सुरुवात होणार आहे. या टी20 मालिकेतील पहिला सामना धरमशाला येथे होणार असून दोन्ही संघाचे खेळाडू धरमशाला येथे पोहचले आहेत.
2019 विश्वचषकानंतर दक्षिण आफ्रिकेची ही पहिलीच मालिका असणार आहे. तर भारतीय संघ यशस्वी वेस्ट इंडीज दौऱ्यानंतर दक्षिण आफ्रिकाविरुद्ध टी20 मालिका खेळण्यासाठी उतरणार आहे.
या टी20 मालिकेतील सामने 15, 18 आणि 22 सप्टेंबरला अनुक्रमे धरमशाला, मोहाली आणि बंगळूरु येथे होतील.
या टी20 मालिकेनंतर दक्षिण आफ्रिकेचा संघ बीसीसीआयच्या अध्यक्षीय एकादश संघाविरुद्ध 3 दिवसीय सराव सामना खेळणार आहे. हा सराव सामना 26 ते 28 सप्टेंबर दरम्यान पार पडेल.
त्यानंतर 2 ऑक्टोबर पासून भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात 3 सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे.
A traditional welcome for #TeamIndia as they arrive in Dharamsala ahead of the 1st T20I against South Africa.#INDvSA pic.twitter.com/oUSxwUQ6ag
— BCCI (@BCCI) September 13, 2019
पहिला कसोटी सामना विशाखापट्टणमला 2 ते 6 ऑक्टोबर दरम्यान होणार आहे. तर दुसरा कसोटी सामना 10 ते 14 ऑक्टोबर दरम्यान पुण्यात आणि तिसरा कसोटी सामना 19 ते 23 ऑक्टोबर दरम्यान रांचीत होणार आहे. ही कसोटी मालिका आयसीसी चॅम्पियनशिपचा भाग असणार आहे.
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात होणाऱ्या टी20 मालिकेत दक्षिण आफ्रिका संघाचे कर्णधारपद यष्टीरक्षक क्विंटॉन डीकॉक सांभाळणार आहे, तर कसोटी मालिकेत फाफ डु प्लेसिस कर्णधार असेल. तसेच भारताचे टी20 आणि कसोटी अशा दोन्ही मालिकांसाठी विराट कोहलीकडे कर्णधारपद असणार आहे.
असे आहे उद्यापासून सुरु होणाऱ्या दक्षिण आफ्रिकेच्या भारत दौऱ्याचे वेळापत्रक –
टी20 मालिका– (भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका)
15 सप्टेंबर – पहिला टी20 सामना – धरमशाला (वेळ – संध्याकाळी 7 वाजता)
18 सप्टेंबर – दुसरा टी20 सामना – मोहाली (वेळ – संध्याकाळी 7 वाजता)
22 सप्टेंबर – तिसरा टी20 सामना – बंगळूरु (वेळ – संध्याकाळी 7 वाजता)
3 दिवसीय सराव सामना – 26 – 28 सप्टेंबर – दक्षिण आफ्रिका विरुद्ध बीसीसीआयचा अध्यक्षीय एकादश संघ (वेळ –सकाळी 9.30 वाजता)
कसोटी मालिका- (भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका)
2-6 ऑक्टोबर – पहिली कसोटी – विशाखापट्टणम (वेळ – सकाळी 9.30 वाजता)
10-14 ऑक्टोबर – दुसरी कसोटी – पुणे (वेळ – सकाळी 9.30 वाजता)
19-23 ऑक्टोबर – तिसरी कसोटी –रांची (वेळ – सकाळी 9.30 वाजता)
टी20 मालिकेसाठी असे आहेत दोन्ही संघांचे खेळाडू –
भारत – विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, केएल राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, रिषभ पंत (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, कृणाल पंड्या, वॉशिंग्टन सुंदर, राहुल चाहर, खलील अहमद, दीपक चाहर, नवदीप सैनी
दक्षिण आफ्रिका – क्विंटन डी कॉक (कर्णधार), रस्सी व्हॅन डर दसन (उपकर्णधार), तेंबा बावूमा, ज्युनियर डाला, बीजॉर्न फॉरच्यून, बोरन हेंड्रिक्स, रीझा हेंड्रिक्स, डेव्हिड मिलर, एन्रीच नॉर्जे, अॅन्डिले फेहलुकवायो, ड्वेन प्रीटोरियस, ताब्राईज शम्सी, जॉन-जॉन स्मट्स.
कसोटी मालिकेसाठी असे आहेत दोन्ही संघांचे खेळाडू –
भारत – विराट कोहली (कर्णधार), मयंक अगरवाल, रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), हनुमा विहारी, रिषभ पंत (यष्टीरक्षक), वृद्धिमान सहा (यष्टीरक्षक), आर अश्विन, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह , इशांत शर्मा, शुभमन गिल.
दक्षिण आफ्रिका – फाफ डू प्लेसिस (कर्णधार), तेंबा बावूमा (उपकर्णधार), थ्यूनिस डी ब्रूयन, क्विंटन डी कॉक, डीन एल्गार, झुबेर हमजा, केशव महाराज, एडेन मार्करम, सेनूरन मुथुसामी, लुंगी एन्गीडी, एन्रिच नॉर्जे, वर्नोन फिलँडर, डेन पिडेड, कागिसो रबाडा, रुडी सेकंड
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–टॉप ५ : स्टिव्ह स्मिथच्या या ५ विक्रमांकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही…
–कसोटी इतिहासात कोणालाही जे जमले नाही ते स्टिव्ह स्मिथने करुन दाखवले!
–८० धावांची खेळी करत स्मिथने केली ६४ वर्षांपूर्वीच्या या विश्वविक्रमाची बरोबरी