---Advertisement---

इशान किशन डोक्याला चेंडू लागल्याने हॉस्पिटलमध्ये दाखल, ‘अशी’ घडली हृदयाचा ठोका चुकवणारी घटना

Ishan-Kishan
---Advertisement---

धरमशाला। भारत विरुद्ध श्रीलंका (India vs Sri Lanka) संघात शनिवारी (२६ फेब्रुवारी) तीन टी२० मालिकेतील (T20I Series) दुसरा सामना (2nd T20I) पार पडला. हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर पार पडलेल्या या सामन्यात भारताने ७ विकेट्सने विजय मिळवला. असे असले तरी, भारतीय संघासाठी चिंतेची गोष्ट अशी की, युवा यष्टीरक्षक फलंदाज इशान किशन (Ishan Kishan) दुखापतग्रस्त झाला आहे, तसेच त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असल्याचेही समजत आहे. 

झाले असे की, सामन्यात इशान फलंदाजी करत असताना चौथ्या षटकात लहिरू कुमाराने टाकलेला वेगवान बाउंसर त्याच्या हेल्मेटवर जोरात आदळला. ज्यामुळे सर्वचजण चिंतेत पडले होते. इशाननेही चेंडू लागल्यानंतर लगेचच हेल्मेट उतरवून ठेवले आणि तो मैदानावर बसला. यानंतर फिजिओने त्याला तपासल्यानंतर त्याने पुढे फलंदाजी कायम करण्याचा निर्णय घेतला, मात्र तो फार काळ टिकू शकला नाही. त्याला ६ व्या षटकात लहिरू कुमारानेच १६ धावांवर बाद केले. त्याचा झेल श्रीलंकेचा कर्णधार दसून शनकाने घेतला.

पण, सामन्यानंतर त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. माध्यमांतील वृत्तानुसार खबरदारी म्हणून त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. तिथे त्याचे स्कॅन करण्यात आले आहे.

मात्र, आता रविवारी (२७ फेब्रुवारी) होणाऱ्या भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील तिसऱ्या टी२० सामन्यात तो खेळणार की नाही, यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. हा सामना देखील धरमशाला येथेच होणार आहे. तसेच जर या सामन्यात इशान खेळला नाही, तर रोहित शर्माबरोबर सलामीला मयंक अगरवाल किंवा संजू सॅमसन फलंदाजी करू शकतात.

भारताने मालिकेत घेतली विजयी आघाडी
भारताने दुसरा टी२० सामना जिंकून श्रीलंकेविरुद्धच्या टी२० मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. या मालिकेतील पहिला सामना भारताने ६२ धावांनी जिंकला होता.

दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेने पाथम निसंकाच्या ७५ धावांच्या खेळीच्या जोरावर प्रथम फलंदाजी करताना ५ बाग १८३ धावा केल्या होत्या. निसंकाव्यतिरिक्त दसून शनकाने नाबाद ४७ आणि दनुष्का गुलतिलकाने ३८ धावांचे महत्त्वपूर्ण योगादान दिले होते. त्यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या भारतीय संघाने १८४ धावांचे लक्ष्य १७.१ षटकात पूर्ण केले. भारताकडून श्रेयस अय्यरने नाबाद ७४ धावांची खेळी केली. तसेच रविंद्र जडेजाने नाबाद ४५ आणि संजू सॅमसननेही ३९ धावांचे योगदान दिले.

महत्त्वाच्या बातम्या 

तब्बल १००१ आंतरराष्ट्रीय विकेट्स घेणाऱ्या शेन वॉर्नला बनायचंय जगातील दिग्गज टीमचा कोच; कोणता आहे तो संघ?

नामिबिया फलंदाजाचा पीएसएलमध्ये कहर! शेवटच्या ६ चेंडूतच पालटला आख्खा डाव; पाकिस्तानच्या गोलंदाजाला धू-धू धुतलं

‘गुडबाय म्हणणं नेहमीच कठीण असतं’, म्हणत पाकिस्तानला रवाना होण्यापूर्वी कुटुंबासाठी वॉर्नरची भावुक पोस्ट

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---