ऑस्ट्रेलियाकडून ऍशेस मालिकेत ०-४ असा पराभव झाल्यानंतर इंग्लंडने मुख्य प्रशिक्षक ख्रिस सिल्व्हरवूडची हाकालपट्टी केली. तेव्हापासून संघ नवीन प्रशिक्षकाच्या शोधात आहे. त्यातच आता ऑस्ट्रेलियाचे माजी फिरकीपटू शेन वॉर्नने (shane warne) इंग्लंड संघाचा प्रशिक्षक होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. शेन वॉर्नच्या मते, तो इंग्लंडचा मुख्य प्रशिक्षक म्हणून खूप चांगली कामगिरी करू शकतो. यावेळी प्रशिक्षक बनणे योग्य ठरेल, असे वॉर्न म्हणाला आहे. संधी मिळाल्यास भूमिका साकारण्यास तयार असल्याचेही तो म्हणाला आहे.
ऍशेस मालिकेतील पराभवानंतर इंग्लंड संघांचे मुख्य प्रशिक्षक ख्रिस सिल्व्हरवूड यांनी आपल्या राजीनामा दिला आहे. ख्रिस यांच्या प्रशिक्षणाखाली इंग्लंडने कसोटी क्रिकेटमध्ये जबरदस्त कामगिरी केली होती. कसोटी सामन्यांमध्ये संघाने दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंकेत विजय मिळवला. ऍशेस मालिकेतील पराभवानंतर त्यांना आपले पद सोडावे लागले होते.
ऍशेस मालिकेतील मानहानीकारक पराभवानंतरही ख्रिस यांना इंग्लंड संघाचे प्रशिक्षकपद सांभाळायचे होते, परंतु त्याच्यावर सर्व बाजूंनी दबाव आला आणि त्यामुळे त्यांनी आता आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. शेन वॉर्नने एका वृत्तवाहिनीच्या पॉडकास्टवर इंग्लंड संघाचा प्रशिक्षक होण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
वॉर्न म्हणाला की, “मला हे काम करायला आवडेल. इंग्लंडचा प्रशिक्षक होण्यासाठी हीच योग्य वेळ आहे. मला वाटते की, मी प्रशिक्षक म्हणून चांगली कामगिरी करू शकेल. संघात खूप काम करावे लागणार आहेत. इंग्लंड संघात खूप चांगले खेळाडू आहेत. आम्हाला काही मूलभूत गोष्टी स्पष्ट कराव्या लागतील. तुम्ही एकही चेंडू टाकू शकत नाही किंवा खूप झेल सोडू शकत नाही. याशिवाय काही खेळाडूंनाही चांगली कामगिरी करता येत नाही.”
वॉर्न आतापर्यंत आयपीएलमध्ये राजस्थान राॅयल्स संघाचा प्रशिक्षक म्हणून दिसला होता. इंग्लंडने अद्याप पूर्णवेळ प्रशिक्षकाची नियुक्ती केलेली नाही. इंग्लंडचा संघ वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर असून माजी क्रिकेटपटू पॉल कॉलिंगवूड यांना या दौऱ्यासाठी संघाचे अंतरिम प्रशिक्षक बनवण्यात आले आहे.
महत्वाच्या बातम्या-
फलंदाजीत सोडा, हिटमॅन रोहितचं क्षेत्ररक्षणातही अर्धशतक, बनला पहिलाच भारतीय; बघा तो खास क्षण
अय्यरमुळे पूर्ण झाला जडेजाचा बदला! सलग ६, ४, ६ ठोकणाऱ्या श्रीलंकन फलंदाजाला असं केलं चालतं






