भारत विरुद्ध श्रीलंका 3 सामन्यांच्या टी20 मालिकेतील पहिला सामना शनिवारी (27 जुलै) रोजी खेळला गेला. या सामन्यात भारतान 43 धावांनी शानदार विजय मिळवला. तसंच भारतीय संघाचे नवे मुख्य प्रशिक्षक गोतम गंभीर (Gautam Gambhir) आणि नवीन टी20 कर्णधार सूर्यकुमार यादवच्या (Suryakumar Yadav) नव्या पर्वाची सुरुवात चांगली झाली. सामना झाल्यानंतर कर्णधार सुर्यकुमार यादवनं (Suryakumar Yadav) त्याला घडवणाऱ्या खेळाडूचं नाव सांगितलं.
सामना झाल्यानंतर सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) म्हणाला की, “जेव्हा मी 2014 मध्ये मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) मधून कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) गेलो, तेव्हा गौतम भाईने मला मागून हाक मारली, स्काय… स्काय (SKY..SKY). सुरुवातीला मी फारसं लक्ष दिलं नाही पण नंतर ते माझ्याकडे आले. तेव्हा ते मला म्हणाले, ‘भाऊ, मी तुलाच बोलावतोय. अरे, तुझी आद्याक्षरे तरी बघ’ मग मला समजलं की ते स्काय (SKY) आहे.”
पुढे बोलताना सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) म्हणाला, “गौतम भाईंना माझ्यात असं काही वाटलं की, जे त्यांनी सांगितल्यावर मी सरळ मार्गावर जाऊ शकतो. त्यामुळे त्यांच्या मार्गदर्शनामुळेच मी आज इथपर्यंत पोहोचलो आहे, असं मी म्हणू शकतो.”
श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यात सूर्यानं झंझावाती अर्धशतक ठोकले. त्याच्या खेळीमुळे भारताला सहज विजय मिळवता आला. सूर्याने त्याच्या 58 धावांच्या खेळीत 8 चौकार आणि 2 षटकार ठोकले. यावेळी त्याचा स्ट्राईक रेट 223.08 राहिला. या सामन्याचा सामनावीर पुरस्कार सूर्यकुमार यादवलाच (Suryakumar Yadav) देण्यात आला.
महत्त्वाच्या बातम्या-
काय सांगता? टी20 चा खरा किंग तर सूर्या, एकदा पाहाच नव्या कर्णधाराचा हा भीम पराक्रम
आज फायनलमध्ये धडकणार भारत आणि श्रीलंका! कुठे आणि कधी पाहायचा सामना?
Paris Olympic 2024: 24 कोटी लोक, फक्त 7 खेळाडू…’, लाइव्ह टीव्हीवर पाकिस्तानचा ‘अपमान’