भारतीय क्रिकेट संघ श्रीलंका दौऱ्यावर रवाना झाला आहे. टीम इंडियाला श्रीलंकेत 3 सामन्यांची टी20 मालिका आणि एकदिवसीय मालिका खेळायची आहे. 27 जुलैपासून टी20 मालिका सुरू होईल. तर एकदिवसीय मालिका 2 ऑगस्टपासून खेळली जाईल. पहिल्या टी20 मध्ये भारताची प्लेइंग इलेव्हन कशी असू शकते, हे या बातमीद्वारे जाणून घ्या.
श्रीलंकेविरुद्धच्या टी20 मालिकेनं टीम इंडियाच्या नव्या पर्वाची सुरुवात होणार आहे. नवीन मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांची ही पहिली मालिका असेल. रोहित शर्मा, विराट कोहली आणि रवींद्र जडेजा यांच्या निवृत्तीनंतर आता नवीन संघ तयार करण्याची तयारी सुरू आहे. अशा परिस्थितीत, जे खेळाडू 2026 टी20 विश्वचषक योजनेचा भाग आहेत, त्यांना या टी20 मालिकेत संधी मिळाली आहे.
उपकर्णधार शुबमन गिल आणि यशस्वी जयस्वाल श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या टी20 मध्ये डावाची सुरुवात करू शकतात. यानंतर यष्टीरक्षक रिषभ पंत तिसऱ्या क्रमांकावर खेळताना दिसू शकतो. 2024 टी20 विश्वचषक स्पर्धेत पंत तिसऱ्या क्रमांकावर खेळला होता. यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादव चौथ्या क्रमांकावर खेळताना दिसेल.
मधल्या फळीत हार्दिक पांड्या, रिंकू सिंह आणि शिवम दुबे मॅच फिनिशरच्या भूमिकेत दिसणार आहेत. दुबे हा सहावा गोलंदाजीचा पर्यायही असेल. अक्षर पटेल आणि रवी बिश्नोई फिरकी विभागाची जबाबदारी सांभाळतील. अक्षर पटेल आठव्या क्रमांकावर फलंदाजी करेल, ज्यामुळे फलंदाजी विभागातही खोली येईल. मोहम्मद सिराज आणि अर्शदीप सिंग यांना वेगवान गोलंदाजीत संधी मिळण्याची शक्यता आहे. हार्दिक उपलब्ध असल्यामुळे कर्णधार सूर्या दोन वेगवान गोलंदाजां खेळवू शकतो.
श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या टी20 मध्ये भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन – शुबमन गिल (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, रिषभ पंत (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव (कर्णधार), हार्दिक पांड्या, रिंकू सिंह, शिवम दुबे, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग आणि मोहम्मद सिराज
महत्त्वाच्या बातम्या –
‘तात्या’ पोलार्डचा भयंकर शॉट, स्टेडियममधील महिला चाहती जखमी! माफी मागतानाचा VIDEO व्हायरल
‘फॅब फोर’च्या शर्यतीत विराट पडला मागे, जो रुटची मोठी आघाडी; लारा-द्रविडचा विक्रमही धोक्यात
इंग्लंडच्या विजयामुळे भारतीय संघाचं नुकसान? वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत मोठा बदल