गुवाहाटी। रविवारी( 5 जानेवारी) भारत विरुद्ध श्रीलंका संघात पहिला टी20 सामना बारसपाडा स्टेडियम येथे होणार होता. पण खेळपट्टी ओली असल्याने या सामन्यात एकही चेंडूचा खेळ झाला नाही.
या सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पण त्यानंतर पाऊस सुरु झाला. यादरम्यान खेळपट्टीवर कव्हर्स टाकण्यात आले होते.
मात्र काही रिपोर्ट्सच्या नुसार हे कव्हर्स फाटलेले असल्याने त्यातून पाणी लीक झाले. ज्यामुळे खेळपट्टी ओली झाली. ती खेळपट्टी सुकवण्यासाठी पुढे 2 तास ग्राउंड स्टाफने प्रयत्न केल्यानंतरही अपयश आल्याने अखेर सामना रात्री 9.55 च्या दरम्यान रद्द करण्यात आला.
यावेळी खेळपट्टी सुकवण्यासाठी सुपर सॉपरबरोबरच इस्त्री आणि हेअर ड्रायरचीही मदत घेण्यात आली, ज्यामुळे सध्या बीसीसीआयवर टीका होत आहे. मात्र एवढे प्रयत्न करुनही खेळपट्टी खेळण्यासाठी योग्य नसल्याने सामना रद्द करण्यात आला.
आता भारत विरुद्ध श्रीलंका संघातील दुसरा टी20 सामना 7 जानेवारीला इंदोर येथे होणार आहे.
श्रीलंका विरुद्ध कितीही धावा केल्या तरी शिखरपेक्षा हा खेळाडूच भारी!
वाचा- 👉https://t.co/wcDhwmTUbn👈#म #मराठी #Cricket @SDhawan25
— Maha Sports (@Maha_Sports) January 6, 2020
विराटच्या चाहत्याने दिलेली ही भेट पाहून तुम्हीही थक्क व्हाल…
वाचा- 👉https://t.co/2iZVoYwDh5👈#म #मराठी #Cricket @imVkohli— Maha Sports (@Maha_Sports) January 6, 2020