शुक्रवारी (10 जानेवारी) महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (MCA), पुणे येथे भारत विरुद्ध श्रीलंका (India vs Sri Lanka) संघात तिसरा आणि अंतिम आंतरराष्ट्रीय टी20 सामना (3rd T20 Match) पार पडला. हा सामना भारताने 78 धावांनी जिंकला. तसेच मालिकाही 2-0 ने खिशात घातली.
या सामन्यात भारताचा वेगवान गोलंदाज शार्दूल ठाकूरने (Shardul Thakur) अष्टपैलू खेळाचे प्रदर्शन करत चांगली कामगिरी केली. त्यामुळे त्याला या सामन्याचा सामनावीर पुरस्कारही देण्यात आला. त्याने या सामन्यात तुफानी फलंदाजी करताना 8 चेंडूत 1 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 22 धावा केल्या.
त्याच्या या आक्रमक फटकेबाजीबद्दल सामना संपल्यानंतर त्याने सांगितले की, “मला असे वाटते की माझ्याकडे फलंदाजी करण्याची क्षमता आहे. मी त्याच्यासाठी जास्त मेहनत घेत आहे. जर मी 8 व्या क्रमांकावर फलंदाजी करत संघासाठी योगदान देत असेल तर, हे संघासाठी खूप महत्त्वाचे आहे.”
शार्दूलने या सामन्यात फलंदाजीसोबत गोलंदाजीतही चांगले योगदान दिले आहे. त्याने 19 धावा देत 2 विकेट्स घेतल्या आहेत. “मी आऊट स्विंगरही टाकू शकतो. त्यामुळे माझे लक्ष चेंडूला स्विंग करण्यावर असते,” असेही शार्दूल यावेळी म्हणाला.
भारत-ऑस्ट्रेलिया वनडे मालिकेत या दोन खेळाडूंमधील द्वंद्व मजेदार असेल – ऍरॉन फिंच
वाचा👉https://t.co/y7jJ7Eh7KK👈#म #मराठी #Cricket #INDvAUS @AaronFinch5
— Maha Sports (@Maha_Sports) January 11, 2020
वाढदिवस विशेष: क्रिकेटमध्ये असा पराक्रम करणारा राहुल द्रविड एकमेव क्रिकेटपटू
वाचा👉https://t.co/TaIapsdHME👈#म #मराठी #Cricket #HappyBirthdayRahulDravid #RahulDravid
— Maha Sports (@Maha_Sports) January 11, 2020