---Advertisement---

शार्दुलने सांगितलं त्या विस्फोटक खेळीचं गुपीत!

On: रविवार, जानेवारी 12, 2020 4:45 PM
---Advertisement---

शुक्रवारी (10 जानेवारी) महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (MCA), पुणे येथे भारत विरुद्ध श्रीलंका (India vs Sri Lanka) संघात तिसरा आणि अंतिम आंतरराष्ट्रीय टी20 सामना (3rd T20 Match) पार पडला. हा सामना भारताने 78 धावांनी जिंकला. तसेच मालिकाही 2-0 ने खिशात घातली.

या सामन्यात भारताचा वेगवान गोलंदाज शार्दूल ठाकूरने (Shardul Thakur)  अष्टपैलू खेळाचे प्रदर्शन करत चांगली कामगिरी केली. त्यामुळे त्याला या सामन्याचा सामनावीर पुरस्कारही देण्यात आला. त्याने या सामन्यात तुफानी फलंदाजी करताना 8 चेंडूत 1 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 22 धावा केल्या.

त्याच्या या आक्रमक फटकेबाजीबद्दल सामना संपल्यानंतर त्याने सांगितले की, “मला असे वाटते की माझ्याकडे फलंदाजी करण्याची क्षमता आहे. मी त्याच्यासाठी जास्त मेहनत घेत आहे. जर मी 8 व्या क्रमांकावर फलंदाजी करत संघासाठी योगदान देत असेल तर, हे संघासाठी खूप महत्त्वाचे आहे.”

शार्दूलने या सामन्यात फलंदाजीसोबत गोलंदाजीतही चांगले योगदान दिले आहे. त्याने 19 धावा देत 2 विकेट्स घेतल्या आहेत. “मी आऊट स्विंगरही टाकू शकतो. त्यामुळे माझे लक्ष चेंडूला स्विंग करण्यावर असते,” असेही शार्दूल यावेळी म्हणाला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---