भारतीय संघ जुलै महिन्यात श्रीलंका दौर्यावर जाणार आहे. या दौर्यावर तीन वनडे सामन्यांची मालिका आणि तीन टी२० सामन्यांची मालिका खेळवली जाईल. बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी याबाबतची घोषणा केली होती.
मात्र हे सामने कुठल्या मैदानावर होतील याबाबत स्पष्टता नव्हती. मात्र आता श्रीलंका क्रिकेट बोर्डाकडून स्पष्टीकरण आले आहे. श्रीलंकन क्रिकेटच्या प्रशासकीय समितीचे अध्यक्ष अर्जुन डी सिल्वा यांनी याबाबत माहिती दिली.
एकाच ठिकाणी होणार सामने
सध्या कोरोनाची परिस्थिती पाहता हा संपूर्ण दौरा एकाच ठिकाणी खेळवण्यात येईल. त्यामुळे सगळे सामने देखील एकाच मैदानावर खेळवले जातील. अर्जुन डी सिल्वा याबाबत बोलतांना म्हणाले, “पूर्ण मालिका एकाच ठिकाणी खेळवली जाईल. सध्या आम्ही असा निर्णय घेतला आहे की कोलंबोत या दौऱ्यातील सगळे सामने खेळवल्या जातील. कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडियमवर या सामन्यांचे आयोजन होईल.”
या दौऱ्याचा संपूर्ण कार्यक्रम अजून निश्चित झाला नाही आहे. मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार १३ जुलैपासून वनडे मालिकेला सुरुवात होईल. तर २२ जुलैपासून टी२० मालिकेला सुरुवात होईल. याबाबत अर्जुन डी सिल्वा म्हणाले, “सध्या हा निर्णय झाला असला तरी ऐनवेळी परिस्थिती पाहून निर्णय घेतला जाईल. कोरोनामुळे प्रेक्षकांना स्टेडियम मध्ये प्रवेश देणे कठीणच आहे. त्यामुळे हे सामने देखील प्रेक्षकांविनाच खेळवले जातील.”
श्रीलंका दौऱ्याला १३ जुलैपासून सुरुवात
भारतीय संघाच्या श्रीलंका दौर्यावर १३ जुलै रोजी वनडे मालिकेतील पहिला सामना खेळवला जाईल. त्यानंतर १६ आणि १९ जुलै रोजी वनडे मालिकेचे उर्वरित दोन सामने खेळवले जातील. वनडे मालिका संपल्यानंतर टी२० मालिकेची सुरुवात होईल. या मालिकेचा पहिला सामना २२ जुलै रोजी खेळवला जाईल. तर उर्वरित दोन सामने अनुक्रमे २४ आणि २७ जुलै रोजी खेळवले जातील. अशा प्रकारे तीन वनडे सामने आणि तीन टी२० सामने खेळवण्यात येतील.
महत्त्वाच्या बातम्या-
सुशीलमुळे कुस्ती क्षेत्राची नाचक्की, कुस्ती महासंघाची त्या घटनेवर मोठी प्रतिक्रिया
क्रिकेटविश्वात हळहळ! मैदानावर हृदयविकाराचा झटका येऊन युवा क्रिकेटपटूचे निधन