---Advertisement---

का लावण्यात आली रवींद्र जडेजावर १ सामन्याची बंदी ?

On: सोमवार, ऑगस्ट 7, 2017 1:23 PM
---Advertisement---

आयसीसी क्रमवारीत अव्व्ल स्थानी असलेल्या भारताच्या स्टार अष्टपैलू खेळाडूला म्हणजेच रवींद्र जडेजाला एका सामन्याची बंदी घालण्यात आली आहे. यामुळे तो पल्लेकेलच्या तिसऱ्या कसोटी सामन्याला मुकणार आहे. गैरवर्तवणुकीचे सहा गुण मागील २४ महिन्यात त्याच्या नावे आहेत यामुळेच त्याला आता एका कसोटी सामन्यासाठी बंदी घालण्यात आली आहे.

नक्की झाले काय ?

कोलंबोमधील कसोटी सामन्याच्या तिसऱ्या डावात जेव्हा श्रीलंका फलंदाजी करत होती तेव्हा जडेजाची गोलंदाजी सुरु होती. करूणारत्नेने रक्षात्मक फटका मारून चेंडू जडेजाकडे ढकलला, जडेजाने तो चेंडू उचलून करुणारत्नेच्या दिशेने फेकला. करूणारत्ने लगेचच बाजूला झाला आणि यष्टीरक्षक सहाने चेंडू पकडला. करूणारत्ने क्रीझमध्ये असूनही जडेजाने चेंडू फेकला हे मैदानावरील पंच रॉड टकर आणि ब्रुस ऑक्सेनफोर्ड बघितले. यामुळेच जडेजाच्या नावावर आणखी ३ गैरवर्तनाचे गुण लावण्यात आले आणि आयसीसीच्या नियमानुसार ६ गुण झाल्यानंतर खेळाडूला १ सामन्याची बंदी घालण्यात येते.

आता पुढे काय ?

भारताने जरी ही मालिका जिंकली असली तरी श्रीलंकेला व्हाईटवॉश करण्याचा प्रयत्न भारता करेल आणि आता संघात कसोटीतील १ नंबर चा गोलंदाज नसल्याचा तोटा भारताला नक्की होईल. भारत आता जडेजाच्या जागी चायनामन फेरकी गोलंदाज कुलदीप यादवला संघात सामील करून घेईल. पण तो जडेजाची उणीव किती भरून काढणार यावर एक प्रश्न चिन्हच असेल.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment