भारतीय संघाचा डावखुरा सलामीवीर शिखर धवन सध्या मुंबईला विलगीकरणात आहे. धवनसोबत इतर खेळाडूसुद्धा मुंबईमध्ये विलगीकरणात आहेत. धवनच्या नेतृत्वातील भारतीय संघ आगामी श्रीलंका दौऱ्यासाठी हा विलगीकरण कालावधी पूर्ण करत आहे. १३ जुलैपासून या दौऱ्याची सुरुवात होणार असून उभय संघाना ३ टी-२० सामने आणि ३ एकदिवसीय सामने खेळायचे आहेत. दरम्यान, धवन आपल्या फिटनेसवर जास्त मेहनत घेतना दिसत आहे.
येत्या श्रीलंका दौऱ्यावर धवन पहिल्यांदाच भारतीय संघाचे कर्णधारपद भूषवेल. धवन सध्या ज्या हॉटेलमध्ये विलागीकरणात आहे, त्याच हॉटेलमध्ये आपल्या फिटनेसवर काम करताना दिसत आहे. त्याने शुक्रवार (१८ जून) रोजी एक फोटो सोशल मिडियावर शेअर केला आहे. या फोटोवर बघून चाहत्यांसह भारतीय क्रिकेटपटूंनी सुद्धा भरभरून प्रतिसाद दिला.
धवनने इंस्टाग्रामवर आपला शर्टलेस फोटो शेअर केला आहे आणि त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘माझा घाम माझ्या हिऱ्यापेक्षा जास्त चमकत आहे.’
धवनच्या या फोटोवर खेळाडू आणि फिल्मी कलाकारांनी सुद्धा प्रतिक्रिया दिल्या आहेत. सर्वात पहिले त्याचा सलामीवीर जोडीदार रोहित शर्माने प्रतिक्रिया देत लिहले की, ‘ओह कि गल’. तसेच सुरेश रैनाने ‘आग’वाली ईमोजी टाकली. चित्रपट अभिनेता मुजमिल इब्राहीमने तर धवनकडून फिटनेसचे सल्ले मागितले आहेत.
https://www.instagram.com/p/CQQUREetq0y/?utm_source=ig_web_button_share_sheet
आगामी श्रीलंका दौरा धवनसाठी अत्यंत महत्वाचा ठरणार आहे. आता धवनकडे श्रीलंकेमध्ये जाऊन आपल्या फलंदाजीसह नेतृत्त्व क्षमता सिद्ध करण्यासाठी चांगली संधी असणार आहे. गेल्या आयपीएलच्या हंगामात धवनने आक्रमक फलंदाजी केली होती. त्याने १७ सामन्यात तब्बल ६१८ धावा केल्या होत्या. याबरोबरच आयपीएल २०२१ मधील ८ सामन्यात ३८० धावा केल्या आहेत. येत्या श्रीलंका दौऱ्यावर धवनने चांगली फलंदाजी केली तर श्रीलंकेचे गोलंदाज संघर्ष करताना दिसतील.
महत्त्वाच्या बातम्या-
प्रशिक्षक, मार्गदर्शक अन् प्रेरक; भारतीय संघाच्या WTC प्रवासामधील ‘नायका’चा व्हिडिओ पाहिलाय का?
जेव्हा पावसामुळे तब्बल १२ दिवस चालला होता कसोटी सामना, तरीही नव्हता लागला निकाल
दोघात तिसरा! पाऊस अन् भारत-न्यूझीलंड सामन्याचे जुने नाते, पाहा यापुर्वी कधी झालं होतं असं