भारतीय संघ जुलै महिन्याच्या अखेरीस श्रीलंकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात टीम इंडिया यजमान श्रीलंकेविरुद्ध 3 एकदिवसीय आणि 3 टी20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. काही दिवसांपूर्वी दोन्ही मालिकांचं वेळापत्रक जाहीर झालं होतं. मात्र आता त्यात थोडा बदल करण्यात आला आहे.
जुन्या वेळापत्रकानुसार ही मालिका 26 जुलैपासून सुरू होणार होती. मात्र आता मालिकेला 27 जुलैपासून सुरुवात होणार आहे. एकदिवसीय मालिकेतील शेवटच्या 2 सामन्यांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. परंतु पहिला एकदिवसीय सामना आता 1 ऑगस्ट ऐवजी 2 ऑगस्ट रोजी खेळला जाईल. टी20 मालिकेतील तीनही सामने पल्लेकेले स्टेडियमवर आणि तीन एकदिवसीय सामने कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडियमवर खेळले जातील.
या मालिकेपासून गौतम गंभीर भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकाची सूत्रे हाती घेणार आहे. तीन टी20 सामने अनुक्रमे 27 जुलै, 28 जुलै आणि 30 जुलैला खेळले जातील. तर तीन एकदिवसीय सामने अनुक्रमे 2 ऑगस्ट, 4 ऑगस्ट आणि 7 ऑगस्ट खेळले जातील.
भारत विरुद्ध श्रीलंका मालिकेचं सुधारित वेळापत्रक
पहिला टी20 – 27 जुलै (पल्लेकेले)
दुसरा टी20 – 28 जुलै (पल्लेकेले)
तिसरा टी20 – 30 जुलै (पल्लेकेले)
पहिला एकदिवसीय – 2 ऑगस्ट (कोलंबो)
दुसरा एकदिवसीय – 4 ऑगस्ट (कोलंबो)
तिसरा एकदिवसीय – 7 ऑगस्ट (कोलंबो)
महत्त्वाच्या बातम्या –
टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफीमधून माघार घेऊ शकते का? असं झालं तर स्पर्धा कशी खेळली जाईल?
मराठमोळ्या क्रिकेटपटूचं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण, झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेत मिळाली संधी
भारताच्या माजी क्रिकेटपटूला कर्करोगानं ग्रासलं, कपिल देव यांची बीसीसीआयकडे मदतीची याचना