---Advertisement---

वेस्ट इंडिजला मायदेशात धूळ चारण्यासाठी धवन लढवणार शक्कल, प्लेइंग Xiमध्ये करणार ‘हा’ बदल

On: रविवार, जुलै 24, 2022 12:59 PM
wi v ind odi
---Advertisement---

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यात सध्या ३ सामन्यांची वनडे मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना जिंकल्यानंतर भारतीय संघाचा आत्मविश्वास उंचावला असेल. तर वेस्ट इंडिजचा संघ दमदार पुनरागमन करत मालिका वाचवण्यासाठी प्रयत्नशील असेल. दरम्यान या सामन्यात दोन्ही संघांच्या प्लेइंग इलेव्हनवर क्रिकेटप्रेमींच्या नजरा लागून असतील. 

भारतीय संघाकडून (Team India) पहिल्या वनडे सामन्यात प्रभारी कर्णधार शिखर धवन (Captain Shikhar Dhawan) याने दमदार खेळी केली होती. त्याचे शतक केवळ ३ धावांनी हुकले होते. ९९ चेंडूत ३ षटकार आणि ११ चौकारांच्या मदतीने त्याने ९७ धावा केल्या होत्या. या खेळीनंतर आता दुसऱ्या सामन्यातही धवनकडून मोठ्या खेळीच्या अपेक्षा असतील. तसेच शुबमन गिल आणि श्रेयस अय्यर यांच्या प्रदर्शनावरही सर्वांची नजर असेल. गिलला जवळपास दीडवर्षांनंतर वनडे संघात पुन्हा जागा मिळाली होती. या संधीचा फायदा घेत त्याने दमदार अर्धशतक केले आणि आपले पुनरागमन गाजवले.

अशात दुसऱ्या वनडे सामन्यातही धवन आणि गिलची जोडीच सलामीला फलंदाजीसाठी येऊ शकते. तर अय्यर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना दिसू शकतो. तर मधल्या फळीत एक बदल दिसू शकतो. यष्टीरक्षक संजू सॅमसनच्या जागी इशान किशनकडे यष्टीरक्षणाची जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे. कोरोनाग्रस्त रविंद्र जडेजाचे पुनरागमन जवळपास अशक्य दिसत आहे.

तर गोलंदाजी विभागात युवा अर्शदीप (Arshdeep Singh) याला नव्याने जागा दिली जाऊ शकते. पहिल्या सामन्यादरम्यान अक्षरने हॅमस्ट्रिंगमुळे मैदान सोडले होते. त्यामुळे अर्शदीपला त्याच्याजागी वनडे पदार्पणाची संधी मिळू शकते. दुसरीकडे वेस्ट इंडिजच्या संघात (Playing Xi) कोणताही बदल न दिसण्याची शक्यता आहे.

अशी असू शकते दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन-
भारत: शिखर धवन (कर्णधार), शुभमन गिल, श्रेयस अय्यर (उपकर्णधार), सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन/इशान किशन (यष्टीरक्षक), दीपक हुड्डा, अक्षर पटेल/अर्शदीप सिंग, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, युझवेंद्र चहल.

वेस्ट इंडिज: शाय होप (यष्टीरक्षक), कायले मेयर्स, शामराह ब्रूक्स, निकोलस पूरन (कर्णधार), ब्रेंडन किंग, रोवमन पॉवेल, रोमॅरियो शेफर्ड, गुडाकेश मोती, जॅडन सील्स, अकिल हुसेन, अल्झारी जोसेफ.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्त्वाच्या बातम्या-

मॅच विनिंग प्रदर्शनानंतर सिराजने सांगितला त्याचा शेवटच्या षटकातील प्लॅन, असा वाचवला सामना

अगंबाई..! रणवीर सिंगनंतर आता भारतीय क्रिकेटरही झाला नग्न, पत्नीकडून करून घेतले फोटोशूट

अभिमानास्पद! नीरज चोप्राने रचला इतिहास, World Athletics Championshipमध्ये जिंकले रौप्य पदक

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---