भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील तिसरा आणि शेवटचा वनडे सामना बुधवारी (२७ जुलै) क्विन्स पार्क ओव्हल, पोर्ट ऑफ स्पेन येथे खेळला जाईल. शिखर धवनच्या नेतृत्त्वाखालील भारतीय संघाने ३ सामन्यांची वनडे मालिका २-० ने जिंकली आहे. परंतु आता पाहुण्या भारतीय संघाचे लक्ष्य यजमान वेस्ट इंडिजला मालिकेच व्हाईटवॉश देण्यावर असेल. मात्र भारतीय संघाच्या क्लिन स्वीपच्या इराद्यात पाऊस अडथळा आणू शकतो.
कशी असेल खेळपट्टी?
उभय संघातील (IND vs WI) तिसरा वनडे सामना (Third ODI) पोर्ट ऑफ स्पेनमध्येच (Port Of Spain) खेळला जाणार आहे. येथील खेळपट्टीकडून फलंदाज आणि गोलंदाज दोघांनाही मदत मिळते. जसजसा खेळ पुढे जातो, तसतशी खेळपट्टी फलंदाजीसाठी आणखी पोषक बनत जाते. त्यामुळे दुसऱ्या डावात फलंदाज खोऱ्याने धावा (Pitch Report) ओढू शकतात.
या मैदानावर तिसऱ्या वनडे सामन्यात सरासरी २७०-२८० धावा बनण्याची शक्यता आहे. त्यामुळे जो कर्णधार नाणेफेक जिंकेल, तो प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेईल. सामन्याच्या सुरुवातीला खेळपट्टीवर ओलावा असेल, ज्याचा फायदा गोलंदाजांचा घेता येईल.
हवामानाच अंदाज
वेदर डॉट कॉमच्या अहवालानुसार, २७ जुलै, बुधवार रोजी पोर्ट ऑफ स्पेनचे तापमान २५-२९ डिग्री सेल्सियसदरम्यान राहण्याची शक्यता (Weather Report) आहे. तसेच आर्द्रता ७६ ते ८५ टक्केदरम्यान असेल. पावसाबद्दल बोलायचे झाले तर, पोर्ट ऑफ स्पेनमध्ये बुधवारी पावसाची ४४ ते ७३ टक्के शक्यता आहे. तसेच जोराचे वारेही वाहू शकते.
भारतीय संघाचे पोर्ट ऑफ स्पेनच्या मैदानावरील प्रदर्शन
पोर्ट ऑफ स्पेनमध्ये भारतीय संघाने आतापर्यंत २३ वनडे सामने खेळले आहेत. यापैकी १३ सामने जिंकण्यात भारतीय संघाला यश आले आहे. तर ९ सामने त्यांनी गमावले आहेत. याखेरीज २ सामना अनिर्णीत राहिला होता. वेस्ट इंडिजच्या संघाने या मैदानावर ५९ वनडे सामने खेळले असून त्यापैकी २७ सामने जिंकले आणि २७ सामने गमावले आहेत. तर उर्वरित ५ सामने अनिर्णीत सुटले आहेत.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
रोहितनंतर बुमराह सांभाळेल कसोटी संघाची धुरा, तर वनडे संघाच्या कॅप्टन्सीसाठी ‘हे’ दोघे दावेदार
भारतीय क्रिकेटप्रेमींसाठी आनंदाची बातमी, इंडियाकडे आयसीसीच्या ‘या’ स्पर्धेचे यजमानपद
डेविड वॉर्नरवर पुन्हा चढला अल्लू अर्जुनचा फिव्हर, ऍक्शन सीनमध्ये दिसतोय डॅशिंग