---Advertisement---

आज मुंबईत होणाऱ्या निर्णायक टी२० सामन्याआधी रोहित शर्मा म्हणाला…

On: बुधवार, डिसेंबर 11, 2019 3:49 PM
---Advertisement---

मुंबई। आज(11 डिसेंबर) भारत विरुद्ध वेस्ट इंडिज संघात टी20 मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना होणार आहे. हा सामना मुबंईच्या वानखेडे मैदानावर होईल. या सामन्याला भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता सरुवात होईल.

या सामन्याआधी बोलताना सलामीवीर फलंदाज रोहित शर्माने म्हटले आहे की सध्या त्यांचे लक्ष ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी 20 विश्वचषकावर नसून सध्यातरी केवळ वेस्ट इंडिज विरुद्धच्या मालिकेवर आहे. 

भारत – वेस्ट इंडिज संघात सुरु असलेल्या या टी20 मालिकेत सध्या पहिल्या 2 सामन्यांनंतर 1-1 अशी बरोबरी झाली असल्याने आज होणारा सामना निर्णायक ठरणार आहे.

या सामन्याआधी बोलताना रोहित म्हणाला, ‘मी टी20 विश्वचषकासाठी संघ बनवत आहे असे मी सतत्याने म्हणू शकत नाही.  विश्वचषक खूप लांब आहे. यावेळी आम्हाला मालिका जिंकण्यावर लक्ष केंद्रित करावे लागेल आणि त्यामुळे आम्ही चांगल्या स्थितीत राहू.’

मर्यादित षटकांच्या भारतीय संघाचा उपकर्णधार रोहित म्हणाला की या वेळी संघाला आपल्या मूलभूत गोष्टी सुधारण्याची गरज आहे आणि सामना जिंकणे आवश्यक आहे जेणेकरुन ते विश्वचषक स्पर्धेची तयारी करू शकतील.

रोहित म्हणाला, ‘जर आपण सामने जिंकत राहिलो आणि निरंतर चांगल्या गोष्टी करत राहिलो तर संघाचे संयोजन आपोआप तयार होईल.’

भारत – वेस्ट इंडिज या दोन्ही संघांकडे टी20 मालिका जिंकण्याची संधी आहे, परंतु मागील सामन्यांच्या चुकांमधून शिकून निर्णायक सामन्यात अधिक चांगले प्रदर्शन करणे हे आव्हान आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---