ऑस्ट्रेलियामध्ये 16 ऑक्टोबरपासून टी20 विश्वचषक खेळला जाणार आहे. पुरूषांचा हा आठवा टी20 विश्वचषक आहे. यासाठी जवळपास सर्व संघ ऑस्ट्रेलियामध्ये दाखल झाले आहेत. काही संघाचे तर सराव सामने सुरूही झाले आहेत. सोमवारी (10 ऑक्टोबर) भारत विरुद्ध वेस्टर्न ऑस्ट्रेलिया यांच्यात पर्थ येथे सराव सामना खेळला गेला. या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी केली. यावेळी स्फोटक फलंदाज सूर्यकुमार यादव याच्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने 6 विकेट्स गमावत 158 धावसंख्या उभारली. हा सामना भारताने 13 धावांनी जिंकला आहे.
भारताच्या डावाची सुरूवात कर्णधार रोहित शर्मा याने रिषभ पंत याच्यासोबत केली. रोहित 3 धावा करत बाद झाला. त्याच्यापाठोपाठ पंतदेखील तंबूत परतला. पहिल्या पॉवरप्लेमध्ये भारताने 2 विकेट्स गमावत 39 धावा केल्या, तर दीपक हुड्डा याने 22 धावा केल्या. त्याच्यानंतर सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पंड्या यांनी डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला. सूर्याकुमार हा त्याच्या कारकिर्दीत पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियात खेळणार आहे. त्याने या सामन्यात 52 धावा आणि पंड्याने 29 धावा केल्या.
लक्ष्याचा पाठलाग करताना वेस्टर्न ऑस्ट्रेलियाची अडखळत सुरूवात झाली. भारताचे वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार आणि अर्शदीप सिंग यांनी सुरूवातीलाच विरोधी संघाला धक्के दिले. दोघांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्याने पहिल्या 6 षटकात वेस्टर्न ऑस्ट्रेलियाची स्थिती 4 बाद 29 अशी झाली. त्याचबरोबर युझवेंद्र चहल यानेही चांगली कामगिरी केली.
चहल आणि भुवनेश्वर यांनी प्रत्येकी दोन-दोन आणि अर्शदीपने तीन विकेट्स घेतल्या. अक्षर पटेल यानेही 3 षटके टाकताना 23 धावा दिल्या. दीपक हुड्डानेही गोलंदाजीत आपला हात आजमावला. त्याने 2 षटकात 24 धावा दिल्या. बाकी गोलंदाजांची चांगली कामगिरी करत असताना पुन्हा एकदा हर्षल पटेल याच्याकडून निराशा झाली. त्याने 4 षटकात 49 धावा देत एक विकेट घेतली.
Innings Break!#TeamIndia post a total of 158/6
Suryakumar Yadav 52 off 35 (3×4, 3×6)
Hardik Pandya 29 off 20 pic.twitter.com/ghN3R0coqr— BCCI (@BCCI) October 10, 2022
अर्शदीपने 3 षटकात 6 धावा देत 3 विकेट्स घेतल्या. तसेच चहल आणि भुवनेश्वर यांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या.
भारत वेस्टर्न ऑस्ट्रेलियाविरुद्ध आणखी एक सामना खेळणार आहे. हा सामना 13 ऑक्टोबरला पर्थ येथेच खेळणार आहे. त्यानंतर भारत 17 ऑक्टोबरला ऑस्ट्रेलिया आणि 19 ऑक्टोबरला न्यूझीलंड विरुद्ध सराव सामने खेळणार आहे. हे दोन्ही सामने ब्रिसबेनच्या गाबा स्टेडियमवर खेळले जाणार आहेत.
भारताचा टी20 विश्वचषकात सुपर 12च्या दुसऱ्या गटात समावेश आहे. त्यामुळे सराव सामने संपल्यावर भारत 23 ऑक्टोबरला पाकिस्तानशी भिडणार आहे. हा सामना मेलबर्न क्रिकेट ग्राउंड, मेलबर्न येथे होणार आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ना इंग्लंड, ना ऑस्ट्रेलिया; आयसीसीच्या मते भारत अन् पाकिस्तानचे ‘हे’ दोन खेळाडूच सर्वात भारी
गौरवास्पद! छोट्याशा कारकीर्दीत स्मृतीने पार केला मैलाचा दगड; महिला क्रिकेट इतिहासात…