भारत विरुद्ध वेस्ट इंडिज संघांमध्ये सध्या ५ टी-२० सामनयांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना रविवार दिनांक ७ ऑगस्ट रोजी अमेरिकेतील फ्लोरिडा येथे खेळला जात आहे. या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यापूर्वीच भारताने या मालिकेत विजय मिळवल्याने शेवटच्या सामन्यासाठी संघात काही बदल दिसले. यातील प्रमुख बदल म्हणजे कर्णधार रोहित शर्माला या सामन्यात विश्रांती दिल्याने नाणेफेकीसाठी कर्णधार म्हणून हार्दिक पंड्या मैदानात उतरला.
सध्यातरी भारताने या मालिकेत खेलल्या गेलेल्या ४ टी-२० समन्यातील ३ सामन्यात एकतर्फी विजय मिळवत मालिका खिशात घातली आहे. त्यामुळे भारताला शेवटच्या सामन्यात नविन प्रयोग करण्यासाठी पुरेपुर संधी उपलब्ध आहे. मात्र, दुसरीकडे वेस्ट इंडिज संघाला या सामन्यात आपली इभ्रत वाचवण्यासाठी संघर्ष करावा लागणार आहे. खासकरून टी-२० क्रिकेटचा विचार केला तर वेस्ट इंडिज संघ क्रिकेटच्या या प्रकारात एक बलाढ्य संघ मानला जातो. मात्र, आत्तापर्यंत भारताने या मालिकेत त्यांना शांत ठेवले आहे. याच कारणाने भारतीय संघाने मालिका आरामात जिंकली आहे. मात्र, आता शेवटच्या सामन्यात वेस्ट इंडिजचा संघ आपला गमावलेला आत्मसन्मान मिळवण्यासाठी संघर्ष करताना दिसू शकतो.
दरम्यान, भारतीय संघाने टी-२० मालिकेपूर्वी वेस्ट इंडिज दौऱ्यात खेळवल्या गेलेल्या ३ वनडे सामन्यांच्या मालिकेतही ३-० ने विजय मिळवत यजमानांना क्लीन स्विप दिला होता. या मालिकेत भारतीय संघाचे स्टार खेळाडू उदाहरणार्थ संघाचा कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह, रिषभ पंत यांन विश्रांती दिली होती. तरीही भारतीय संघाने या मालिकेत ३-०ने मिळवलेला विजय भारतीय संघाकडे उपलब्ध असलेल्या प्रतिभावान खेळाडूंची ताकद दाखवून देण्यासाठी पुरेसा आहे.
पाचव्या टी-२० सामन्यासाठी उभय संघ
🚨 Team News 🚨
4⃣ changes for #TeamIndia as @hardikpandya7, @ishankishan51, @ShreyasIyer15 & @imkuldeep18 are named in the team. #WIvIND
Follow the match 👉 https://t.co/EgKXTsTCq2
A look at our Playing XI 🔽 pic.twitter.com/rPvLJc1PBZ
— BCCI (@BCCI) August 7, 2022
भारत- ईशान किशन, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन, हार्दिक पंड्या (कर्णधार), दिपक हुड्डा, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), अक्षर पटेल, कुलदिप यादव, आवेश खान, रवि बिश्नोई, अर्शदीप सिंग
वेस्ट इंडिज- शेमराह ब्रुक्स, शिमरॉन हेटमायर, निकोलस पूरन (कर्णधार), डेवॉन थॉमस (यष्टीरक्षक), जेसन होल्डर, ओडियन स्मिथ, किमो पॉल, डॉमिनिक ड्रेक्स, ओबेद मॅकॉय, हेडन वॉल्श, रोवमन पॉवेल
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
VIDEO। हॉकीचे मैदान गाजवणाऱ्या महिला संघाला मेन्स हॉकी टीमने दिला विशेष सन्मान