मुंबई। भारत विरुद्ध विंडीज संघात सुरू असलेल्या चौथ्या वनडे सामन्यात भारताचा धडाकेबाज सलामीवीर रोहित शर्माने 137 चेंडूत 162 धावांची तुफानी खेळी केली आहे. यामध्ये त्याने 20 चौकार आणि 4 षटकार ठोकले.
यावेळी रोहितने वनडेमध्ये 21व्या शतकाबरोबरच 7 वेळा 150 पेक्षा सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम केला आहे. तसेच एका वनडे मालिकेत दोनदा 150 पेक्षा सर्वाधिक धावा करणारा तो दुसराच फलंदाज ठरला आहे. याआधी अशी कामगिरी झिम्बाब्वेच्या हॅमिल्टन मसाकादजाने 2009मध्ये केनिया विरुद्ध केली होती.
रोहितबरोबरच मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि ऑस्ट्रेलियाचा डेविड वॉर्नर यांनी वनडेमध्ये प्रत्येकी 5 वेळा 150 पेक्षा सर्वाधिक धावा केल्या आहेत.
तसेच श्रीलंकेचा सनथ जयसुर्या, विंडीजचा स्फोटक फलंदाज ख्रिस गेल, दक्षिण आफ्रिकेचा हाशिम आमला आणि भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली यांनी वनडेमध्ये प्रत्येकी 4 वेळा 150 पेक्षा सर्वाधिक धावा केल्या आहेत.
वनडेमध्ये 150 किंवा त्यापेक्षा अधिक धावा करणारे खेळाडू –
7 – रोहित शर्मा
5 – सचिन तेंडुलकर आणि डेविड वॉर्नर
4 – सनथ जयसुर्या, ख्रिस गेल, हाशिम आमला आणि विराट कोहली
महत्त्वाच्या बातम्या:
–हिटमॅन रोहित शर्माने मोडला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा विक्रम
–विराट नाही तर रोहित शर्माच ठरला खरा किंग, जाणून घ्या काय आहे कारण…
–तब्बल अठरा वर्षांनंतर हा संघ खेळणार रणजी ट्रॉफी
–वन-डेत रोहित सचिनइतकाच हिट.. जाणुन घ्या काय आहे कारण?