भारताच्या दौऱ्यावर आलेल्या विंडीज संघासोबत भारत 2 कसोटी ,5 वन-डे आणि 3 टी-20 सामने खेळणार आहे. या मालिकेतील पहिला कसोटी सामना 4 आॅक्टोबरपासून सुरू होणार आहे.
दोन सामन्यांसाठी भारतीय संघ निवडला गेला आहे. निवड समितीने ह्या वेळी घरगुती सामन्यांमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना संधी दिली आहे.
शिखर धवन आणि मुरली विजय ह्या दोन्ही खेळाडूंना निवड समितीने घरचा रस्ता दाखवला आहे. त्यावर बरीच चर्चा घडून आली आहे. काहींना हा बदल आवडला नाही तर काहींनी याचे स्वागत केले आहे.
भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने देखील निवडलेल्या भारतीय संघावर आपले मत व्यक्त केले आहे.
संपुर्ण इंग्लड दौऱ्यात शिखर धवनचा फाॅर्म अतिशय खराब राहिला होता. त्याने या मलिकेत फक्त 20 च्या सरासरीने धावा केल्या होत्या. त्यानंतर एशिया कप स्पर्धेत त्याने सर्वात जास्त धावा काढत मालिकावीर ठरला होता. त्यामुळे निवड समितीवर टिका करण्यात आली होती.
गांगुली मात्र निवड समितीच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहिला आहे. शिखरला वगळणे अपेक्षित होते. त्यामुळे त्याला वगळल्यामुळे आपल्याला अजिबात आश्चर्य वाटले नाही. त्याला इंग्लड दौऱ्यात चांगली कामगिरी करता आली नव्हती. त्याशिवाय नविन खेळाडूंना संधी मिळणे गरजेचे होत, असे माध्यमांशी बोलताना गांगुलीने सांगितले.
दुसऱ्या बाजूला भुवनेश्वर कुमारला विश्रांती दिल्याने आश्चर्य वाटले आहे. दुखापतीनंतर एशिया कप स्पर्धेत पुनरागमन करणाऱ्या भुवनेश्वरला आॅस्ट्रेलियाचा दौरा ध्यानात ठेवून विश्रांती दिल्याचे निवड समितीच्या सदस्यांनी सांगितले होते.
वेगवान गोलंदाज संघात असण्यासाठी गांगुली आग्रही आहे. युवा पृथ्वी शाॅला संघात स्थान मिळाल्याने गांगुलीला आनंद झाला आहे.
महत्वाच्या बातम्या-






