भारतीय पुरूष क्रिकेट संघ झिम्बाब्वेच्या (ZIMvsIND)दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात तीन सामन्यांची वनडे मालिका खेळली जाणार आहे. यातील पहिला सामना गुरूवारी (१८ ऑगस्ट) खेळला जाणार आहे. हे तिन्ही सामने हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे येथे खेळले जाणार आहेत. या मालिकेत भारताचा स्फोटक फलंदाज शिखर धवनला मोठा विक्रम करण्याची संधी आहे. त्याचबरोबर या मालिकेत भारताचे नेतृत्व करणाऱ्या केएल राहुलकडेही काही विक्रमे मोडण्याची संधी आहे.
भारताचा सलामीवीर आणि डाव्या हाताचा फलंदाज शिखर धवन (Shikhar Dhawan) याच्याकडे सचिन तेंडूलकर, सौरव गांगुली, एमएस धोनी आणि विराट कोहली (Virat Kohli) या खेळाडूंना मागे टाकण्याची संधी आहे. हरारेमध्ये आतापर्यंत धवनने तीन सामन्यांत १६८ धावा केल्या आहेत. यातील त्याची ११६ ही सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या ठरली असून त्याची सरासरी ५६ राहिली आहे. यामुळे धवनकडे हरारेमध्ये सर्वाधिक धावा करणारा भारतीय खेळाडू हा विक्रम करण्याची संधी आहे. यासाठी त्याला तीन वनडे सामन्यात एकूण २०२ धावांची आवश्यकता आहे. सध्या तरी हा विक्रम अंबाती रायुडू याच्या नावावर आहे. त्याने ७ डावांमध्ये ३६९ धावा केल्या आहेत. त्याची सरासरी १२३ राहिली आहे. यावेळी त्याने १ शतक आणि २ अर्धशतके ठोकली आहेत.
धवनला फक्त रायुडूला मागे टाकण्याची संधी नाही तर केएल राहुल (KL Rahul) यालाही मागे टाकण्याची संधी आहे. राहुलने तीन डावात १९६ धावा केल्या आहेत. तर राहुलला रायुडूला मागे टाकण्यासाठी १७४ धावा कराव्या लागणार आहेत. यामुळे आगामी मालिकेत दोन्ही सलामीवीरांपैकी कोण रचणार धावांचा रतीब आणि कोण मोडणार विक्रम? हे पाहणे चुरशीचे ठरणार आहे.
हरारेमध्ये वनडेत सर्वाधिक धावा करणारे भारतीय
धावा खेळाडू
३६९ अंबाती रायुडू
३१४ सचिन तेंडूलकर
२९३ मोहम्मद कैफ
२८३ विराट कोहली
२२८ सौरव गांगुली
२१६ युवराज सिंग
१९६ केएल राहुल
१७५ राहुल द्रविड
१७४ विरेंद्र सेहवाग
१७१ एमएस धोनी
१६८ शिखर धवन
भारत विरुद्ध झिम्बाब्वे मालिकेत खालील खेळाडूंना विक्रम मोडण्याची संधी
-केएल राहुलने या मालिकेत ७ झेल घेतले तर त्याचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १०० झेल पूर्ण होतील.
-शिखर धवनने ४३३ धावा केल्या तर त्याचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ११ हजार धावा पूर्ण होतील.
-केएल राहुलने या मालिकेत ३६६ धावा केल्या तर त्याचे वनडेमध्ये दोन हजार धावा पूर्ण होतील.
-झिम्बाब्वेच्या रियान बर्गने ५ विकेट्स घेतल्या तर त्याचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ५० विकेट्स पूर्ण होतील.
-सिंकदर रजाला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ६ हजार धावा पूर्ण करण्यासाठी २९० धावांची आवश्यकता आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
रोहित शर्माची एक झलक पाहण्यासाठी लोटला जनसागर, व्हिडिओ होतोयं भन्नाट व्हायरल
भारतीय संघाच्या कामगिरीवर कर्णधार खूष! ‘हा एक चांगला अनुभव होता’ म्हणत थोपटली पाठ
‘त्याच्यावर टीका होतेय, कारण…’ भारताच्या माजी कर्णधाराने केली पंतची पाठराखण