आतापर्यंत दोन्ही वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल (WTC Final) इंग्लंडमध्ये खेळवण्यात आले आहेत, तर 2025चा फायनल (WTC Final 2025) इंग्लंडमधील लॉर्ड्सच्या मैदानावर खेळवण्यात येईल. या विषयावर अनेक वेळा प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत की वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा फायनल इंग्लंडबाहेर खेळवला जावा. आता एका मीडिया रिपोर्ट्समध्ये असे समोर आले आहे की भारत 2027च्या जागतिक चॅम्पियनशिप फायनलचे (WTC Final 2027) आयोजन करण्याची इच्छा व्यक्त करू शकतो.
द इंडियन एक्सप्रेसमध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, भारत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलचे आयोजन करू इच्छित आहे आणि त्यासाठी बोली देखील लावली आहे. बीसीसीआयने गेल्या महिन्यात झिम्बाब्वेमध्ये झालेल्या आयसीसी मुख्य कार्यकारी समितीच्या बैठकीत ही मागणी मांडली. भारताच्या वतीने, सध्या आयपीएल अध्यक्षपद भूषवणारे अरुण सिंग धुमल यांनी ही मागणी मांडली.
2021 मध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा पहिला फायनल इंग्लंडमधील हॅम्पशायर येथे खेळवण्यात आला होता. त्या जेतेपदाच्या लढतीत न्यूझीलंडने भारताचा 8 गडी राखून धुव्वा उडवला आणि ट्रॉफीवर आपले नाव कोरले. दुसरा फायनल सामना 2023 मध्ये खेळवण्यात आला होता, जो लंडनमधील ओव्हल मैदानावर आयोजित करण्यात आला होता. यावेळी भारतीय संघाला फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने 209 धावांनी पराभूत केले होते.
आता फायनल अंतिम सामना ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळवला जाईल, जो इंग्लंडमध्येच आयोजित केला जाणार आहे. इंग्लंडच्या लॉर्ड्स मैदानावर 2025च्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेचे आयोजन केले जाईल. आता भारताच्या मागणीमुळे इंग्लंडमध्ये फायनल सामना खेळण्याची मालिका खंडित होऊ शकते. 2025-27 च्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेबद्दल बोलायचे झाले तर, भारत इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेने आपल्या मोहिमेची सुरुवात करेल. दरम्यान दोन्ही संघात 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाईल.
🚨 INDIA WANTS TO HOST WTC FINAL. 🚨
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) May 9, 2025
– The BCCI expressed their interest in hosting 2027 WTC Final. (The Guardian). pic.twitter.com/pTotnp17Xe