मैदानावर काही खेळाडू विकेट घेतल्याच्या आनंद एका वेगळ्याच पद्धतीने साजरा करतात. यावेळी चुकून एखाद्याला धक्का लागला तर वाद निर्माण होण्याची शक्यता असते. असेच काहीसे दृश्य लिसेस्टरशायर विरुद्ध भारत (Leicestershire vs India) सराव सामन्यात दिसले. हा सामना २३ जूनला सुरू झाला असून तो चार दिवस खेळला जाणार आहे. या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी सामना सुरू असताना भारताचा संघ क्षेत्ररक्षण करत असताना एका खेळाडूने दुसऱ्याला धक्का दिला. नेमके काय प्रकरण होते हे आपण पाहुया.
लिसेस्टरशायरचा संघ फलंदाजी करत असताना शार्दुल ठाकूर गोलंदाजीला आला. त्याने टाकलेला चेंडू बॅटची कड घेऊन स्लिपमध्ये उभ्या असलेल्या रवींद्र जडेजाने तो झेल घेतला. यावेळी शार्दुल या विकेटचा आनंद व्यक्त करण्यासाठी जडेजाकडे गेला असता त्याने त्याला थोडा धक्का दिला. हा प्रकार काही गंभीर नसून ते दोघे नंतर हसताना दिसले. लिसेस्टरशायरने हा व्हिडिओ ट्वीटरवर शेयर केला असून तो आता चांगलाच व्हायरल होत आहे.
☝️ | Bates (8), 𝐜 Jadeja, 𝐛 Thakur.
Here's the moment @imshared picked up his first wicket of the day. Bates edged behind and Jadeja pouched the catch at first slip. 👐
🦊 LEI 157/6.
𝐋𝐈𝐕𝐄 𝐒𝐓𝐑𝐄𝐀𝐌: https://t.co/3NAp7sxure👈
🦊 #IndiaTourMatch | #LEIvIND | #TeamIndia pic.twitter.com/Lhp4TkhQuo
— Leicestershire CCC 🏏 (@leicsccc) June 24, 2022
शार्दुल आणि जडेजा हे मैदानाबाहेर चांगले मित्र आहेत. आयपीएलमध्ये (इंडियन प्रीमियर लीग) हे दोघे चेन्नई सुपर किंग्जकडून खेळले आहेत. शार्दुलने या सामन्यात दोन विकेट्स घेतल्या.
या सामन्यात भारताचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याच निर्णय घेतला. भारताने पहिला डाव २४६ धावांवर घोषित केला. फलंदाजीला आलेल्या लिसेस्टरशायर विरुद्ध भारतीय गोलंदाज लयीत दिसत होते. २४४ धावांवरच त्यांचा पहिला डाव गुंडाळला गेला. यावेळी मोहम्मद शमी आणि रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी ३-३ विकेट्स घेतल्या. शमीने या सामन्यात तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) याला शून्यावर बाद केले होते. त्याने पुजाराची गळाभेट घेत विकेटचे सेलेब्रेशन केले.
भारताकडून केएस भरतने सर्वाधिक नाबाद ७० धावा केल्या आहेत. पुजारा, रिषभ पंत, प्रसिद्ध कृष्णा आणि जसप्रीत बुमराह हे चार खेळाडू लिसेस्टरकडून खेळत आहेत. यावेळी लिसेस्टरशायरच्या पहिल्या डावात पंतने सर्वाधिक ७६ धावा केल्या आहेत.
दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला असता भारताने एक विकेट गमावत ८० धावा केल्या आहेत. भरत ३१ आणि हनुमा विहारी ९ धावा करत खेळपट्टीवर उपस्थित आहेत. या सामन्यानंतर भारत १ ते ५ जुलै दरम्यान इंग्लंड विरुद्ध एजबस्टन, बर्मिंघम येथे कसोटी सामना खेळणार आहे. या कसोटीसाठी भारतीय संघाला हा सराव सामना खेळणे आवश्यक होते.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
भारतीय संघाच्या पहिल्या विश्वविजेतेपदाची ३९ वर्षे
अखेर पाकिस्तानी खेळाडूंची चांंदी होणार!, पीसीबीने उचलले धाडसी पाऊल