---Advertisement---

सर्वांचा लाडका ‘डीके’ झाला 39 वर्षांचा! धोनीच्या सावलीत झाकोळली गेली अख्खी क्रिकेट कारकीर्द

On: शनिवार, जून 1, 2024 1:23 PM
Dinesh Karthik
---Advertisement---

140 कोटी लोकसंख्येच्या देशात फार कमी खेळाडूंना देशाकडून खेळण्याची संधी मिळते. त्यातच जर त्या खेळाडूनं देशाकडून खेळताना विश्वचषक जिंकला असेल, तर त्याहून मोठी उपलब्धी काहीच नाही. दिनेश कार्तिक हा अशाच मोजक्या भारतीय खेळाडूंपैकी एक आहे. आज (1 जून) त्याचा वाढदिवस. या दिवशी आपण त्याच्या क्रिकेट कारकिर्दीवर एक नजर टाकूया.

यष्टिरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक हा 2007 टी20 विश्वचषक आणि 2013 चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणाऱ्या भारतीय संघाचा सदस्य आहे. 1 जून रोजी तो 39 वर्षांचा झाला. या वयातही त्याची मैदानावरील चपळता स्पष्टपणे दिसून येते. त्याचं यष्टीमागील कौशल्यही अप्रतिम आहे.

दिनेश कार्तिकचा जन्म 1 जून 1985 रोजी चेन्नई येथे झाला. त्यानं 2015 मध्ये भारताची स्टार स्क्वॅशपटू दीपिका पल्लीकलसोबत लग्न केलं. कार्तिकनं 2004 साली भारतीय संघासाठी कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. मात्र सातत्य राखू न शकल्यामुळे त्याला भारतीय संघातील स्थान गमवावं लागलं. या दरम्यान महेंद्रसिंह धोनीनं यष्टीरक्षक फलंदाज म्हणून आपली जागा पक्की केली आणि कार्तिक त्याच्या संपूर्ण कारकिर्दीत धोनीच्या सावलीतच राहिला.

कार्तिकनं 2006 मध्ये भारताकडून टी20 क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर त्यानं टीम इंडियासोबत 2007 चा टी20 विश्वचषक जिंकला. आयपीएलच्या पहिल्या हंगामात तो दिल्ली डेअरडेव्हिल्सकडून खेळला होता. यानंतर तो या स्पर्धेच्या प्रत्येक हंगामात खेळला आहे. दिनेश कार्तिक आयपीएलमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाब, मुंबई इंडियन्स, गुजरात लायन्स, कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळला आहे. त्यानं 2013 मध्ये मुंबई इंडियन्ससोबत असताना आयपीएलचं विजेतेपद पटकावलं होतं.

कार्तिक आयपीएलमध्ये महेंद्रसिंह धोनीनंतर संयुक्तपणे सर्वाधिक सामने खेळणारा खेळाडू आहे. धोनीनं आयपीएलमध्ये 264 सामने खेळले आहेत. तर दिनेश कार्तिक आणि रोहित शर्मा यांनी प्रत्येकी 257 सामने खेळले आहेत. कार्तिकनं आयपीएलच्या 257 सामन्यांमध्ये 4842 धावा केल्या असून, 97 ही त्याची सर्वोत्तम खेळी आहे.

दिनेश कार्तिक भारतीय संघाकडून कसोटी, एकदिवसीय आणि टी20 अशा तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळला आहे. त्यानं टीम इंडियासाठी 26 कसोटी सामन्यांमध्ये 1025 धावा, 94 एकदिवसीय सामन्यांमध्ये 1752 धावा आणि 60 टी20 सामन्यांमध्ये 686 धावा केल्या आहेत. त्यानं कसोटीमध्ये एकमेव शतक झळकावलंय.

महत्त्वाच्या बातम्या – 

मोठी बातमी! टी20 विश्वचषकापूर्वी इंग्लंड संघात खळबळ! स्टार क्रिकेटपटू सट्टेबाजीमुळे निलंबित

टी20 विश्वचषकापूर्वी सुरेश रैनानं दिली प्रतिक्रिया म्हणाला, “भारतीय संघाची जिंकण्याची…”

टी 20 विश्वचषकापूर्वी उद्या (1 जून) रंगणार भारत आणि बांगल्देश यांच्यात सराव सामना

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---