भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चार कसोटी सामन्यांच्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफी मालिकेच्या पहिल्या सामन्यात भारतीय संघाची कामगिरी अत्यंत निराशाजनक राहिली होती. या सामन्यात भारतीय फलंदाजांचा दुसऱ्या डावातील खेळ अत्यंत लज्जास्पद होता. भारताचा संपूर्ण संघ केवळ ३६ धावा काढण्यात यशस्वी झालेला. ही भारताची कसोटीतील आतापर्यंतची सर्वात निच्चांकी धावसंख्या आहे. या लाजिरवाण्या कामगिरीनंतर भारतीय फलंदाजांवर जोरदार टीका झाली होती.
मात्र, आता भारतीय संघ दुसर्या सामन्यासाठी सज्ज झाला आहे. भारतीय संघावर प्रश्न उठत असताना, ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज खेळाडू डॅरेन लेहमनला असा विश्वास आहे की, पुढील सामन्यात भारतीय संघ पलटवार करू शकतो.
भारतीय संघाकडे पलटवार करण्याचे सामर्थ्य
ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचे प्रशिक्षक राहिलेल्या डॅरेन लेहमन यांनी एका मुलाखतीत भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेविषयी विस्तृत चर्चा केली.
भारतीय संघाविषयी बोलताना लेहमन म्हणाले, “ऍडलेड कसोटी सामन्यात भारतीय संघाला काही अडचणी आल्या हे खरे आहे. मात्र, भारतीय संघाच्या फलंदाजांची फळी मजबूत व खोल आहे. फलंदाजीच्या बळावर हा संघ पलटवार करू शकतो. मेलबर्नची खेळपट्टी सपाट आणि फलंदाजीला पोषक असते. ही परिस्थिती भारतीय संघाच्या हिताची आहे. फलंदाजांनी पहिल्या डावात मोठ्या धावा उभारल्या तर, भारतीय संघाला त्याचा फायदा होईल.”
रहाणे करणार भारताचे नेतृत्व
चार सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या कसोटीत भारतीय संघाला लाजीरवाणा पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर, आता भारतीय संघाच्या अडचणीत आणखी भर पडली आहे. नियमित कर्णधार व प्रमुख फलंदाज विराट कोहली पालकत्व रजेमुळे मायदेशी परतला आहे. दुसरीकडे, अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी पहिल्या कसोटीत झालेल्या दुखापतीमुळे उर्वरित मालिकेतून बाहेर पडला. विराटच्या अनुपस्थित अजिंक्य राहणे भारताचे नेतृत्व करेल.
भारतीय संघात होऊ शकतात मोठे बदल
भारतीय संघ व्यवस्थापन २६ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या ‘बॉक्सिंग डे’ कसोटीसाठी संघात भरपूर बदल करण्याची शक्यता आहे. विराट व शमी यांच्या अनुपस्थितीत शुबमन गिल आणि मोहम्मद सिराज कसोटी पदार्पण करू शकतात. तर, पहिल्या सामन्यात अपयशी ठरलेल्या पृथ्वी शॉ, हनुमा विहारी आणि यष्टीरक्षक वृद्धिमान साहा यांच्याऐवजी अनुक्रमे केएल राहुल, रवींद्र जडेजा व रिषभ पंत यांना संधी मिळू शकते.
महत्त्वाच्या बातम्या –
“विराट असा खेळाडू, ज्याच्याबद्दल एका शब्दात व्यक्त होणे अशक्य”
अरेरे! पुढील ६ महिन्यांसाठी टीम इंडियाचा धडाकेबाज गोलंदाज संघातून बाहेर
‘कृपा कर आणि आता पाकिस्तानच्या प्रशिक्षकपदाचाही राजीनामा दे’, चाहत्यांची जोरदार मागणी
ट्रेंडिंग लेख –
व्हिडिओ : त्या दिवशी विराटने शतक केलं अन् गंभीरने दिली सर्वात भारी भेट
गुडबाय २०२०: या’ पाच क्रीडासुंदरींनी घेतली यावर्षी निवृत्ती; एक होती जगातील सर्वात सुंदर क्रीडापटू
…अन् पियुष चावलाने घेतलेल्या त्या विकेटचा एका वर्षात सचिनने घेतला बदला