---Advertisement---

टीम इंडिया दमतेय! सलग तीन दिवस खेळणार सामने, नियोजनाचा उडाला फज्जा

On: रविवार, सप्टेंबर 10, 2023 11:36 PM
---Advertisement---

आशिया चषक 2023 स्पर्धेत रविवारी (10 सप्टेंबर) भारत विरुद्ध पाकिस्तान असा सामना खेळला जात होता. कोलंबो येथे खेळल्या जात असलेल्या या सामन्यात भारतीय संघाला प्रथम फलंदाजीसाठी निमंत्रित करण्यात आलेले. मात्र, भारतीय संघाने शानदार सुरुवात केल्यानंतर पावसाला सुरुवात झाल्याने दिवसाचा पुढील खेळ होऊ शकला नाही. अखेर हा सामना राखीव दिवशी म्हणजे सोमवारी (11 सप्टेंबर) खेळला जाईल. मात्र, यामुळे भारतीय संघाला सलग तीन दिवस मैदानावर उतरावे लागणार आहे.

भारतीय संघाचा डाव सुरू असताना 24.1 षटकानंतर पावसाचे आगमन झाले. जवळपास दोन तास जोरदार पाऊस झाल्याने मैदान काहीसे खराब झाले होते. पाऊस थांबल्यानंतरही मैदान कर्मचाऱ्यांनी प्रयत्नांची शर्थ करत खेळ सुरू करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांचे प्रयत्न अपुरे पडले. अखेर खेळ दुसऱ्या दिवशी सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. या स्पर्धेत अंतिम सामन्याव्यतिरिक्त केवळ भारत-पाकिस्तान या सामन्यासाठीच राखीव दिवस ठेवण्यात आला आहे.

आता हा सामना सोमवारी पूर्ण होणार असल्याने भारतीय संघाची चांगलीच दमछाक होणार असल्याचे दिसते. कारण, हा सामना सोमवारी पूर्ण झाला तर भारतीय संघाला मंगळवारी पुन्हा मैदानात उतरावे लागेल. कारण, सुपर 4 फेरीतील भारताचा दुसरा सामना मंगळवारी श्रीलंकेविरुद्ध होणार आहे. त्यामुळे सलग तीन दिवस भारतीय संघ मैदानात दिसेल. या व्यतिरिक्त 16 सप्टेंबर रोजी भारत विरुद्ध बांगलादेश असा सामना होईल. त्यामुळे भारतीय गोलंदाजांची प्रामुख्याने परीक्षा असेल.

(India Will Play Three Consecutive Days In Asia Cup It’s Hectic Schedule For Indian Bowlers)

हेही वाचाच-
बदला घेतलाच! पहिल्याच ओव्हरमध्ये हिटमॅनने शाहिनला भिरकावला, पाहा कडक सिक्स
श्रेयस पुन्हा दुखापतग्रस्त! पाठीच्या दुखण्याने खाल्ली उचल, वर्ल्डकपआधी वाढली चिंता

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---