---Advertisement---

टीम इंडिया टी20 मालिकेसाठी जुलैमध्ये करणार झिम्बाब्वेचा दौरा, बीसीसीआयने जाहीर केले वेळापत्रक

On: बुधवार, एप्रिल 1, 2026 3:20 PM
---Advertisement---

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) बुधवारी (१ एप्रिल) भारतीय पुरुष संघाच्या झिम्बाब्वे दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर केले आहे. भारत यावर्षीच्या जुलै महिन्यात तीन टी२० सामन्यांच्या मालिकेसाठी झिम्बाब्वेला जाणार आहे. ही मालिका २३ जुलैपासून सुरू होणार आहे. यामधील तिसरा आणि अंतिम सामना २६ जुलैला खेळला जाणार आहे. भारताने याआधी २०२४ मध्ये झिम्बाब्वेचा दौरा केला होता. त्यामध्ये पाच टी२० सामने खेळले होते.

जाहीर केलेल्या टी२० मालिकेतील तिन्ही सामने हरारेच्या स्पोर्ट्स क्लबवर खेळले जाणार आहेत. दुसरा सामना २५ जुलैला खेळला जाणार आहे. बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी भारताच्या दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर केले आहे. यामुळे आयपीएल संपल्यावर भारत सुमारे १० टी२० सामने खेळणार आहेत. त्याची सुरूवात आयर्लंडविरुद्ध होणार आहे. भारत आयर्लंडविरुद्ध २६ जून आणि २८ जूनला टी२० सामने खेळणार आहे.

भारत इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांची टी२० मालिका खेळली जाणार आहे. यातील पहिला सामना १ जुलै, दुसरा सामना ४ जुलै, तिसरा सामना ७ जुलै, चौथा सामना ९ जुलै आणि पाचवा सामना ११ जुलैला खेळला जाणार आहे. त्यानंतर भारत झिम्बाब्वेच्या दौऱ्यावर जाणार आहे.

त्याचबरोबर झिम्बाब्वेचा संघ २०२७ च्या सुरूवातीला भारताच्या दौऱ्यावर येणार आहे. यामध्ये तीन सामन्यांची वनडे मालिका खेळली जाणार आहे. यामधील पहिला सामना ३ जानेवारीला कोलकाता, दुसरा सामना ६ जानेवारीला हैद्राबाद आणि तिसरा सामना ९ जानेवारीला मुंबईमध्ये खेळला जाणार आहे. ही मालिका दोन्ही संघांना आयसीसी वनडे क्रिकेट विश्वचषक २०२७ च्या दृष्टीने महत्वाची असणार आहे.

या विश्वचषकाचे सामने दक्षिण आफ्रिका, नामिबिया आणि झिम्बाब्वे येथे खेळले जाणार आहेत. ही स्पर्धा ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान खेळली जाणार आहे.

भारताचा झिम्बाब्वे दौरा २०२६
पहिला टी२० सामना – २३ जुलै, २०२६ (हरारे)
दुसरा टी२० सामना – २५ जुलै, २०२६ (हरारे)
तिसरा टी२० सामना – २६ जुलै, २०२६ (हरारे)

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---