वेस्ट इंडीज आणि भारत यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिला सामना पोर्ट ऑफ स्पेन येथे खेळला गेला. अत्यंत अटीतटीच्या झालेल्या या सामन्यात भारतीय संघाने तीन धावांनी विजय मिळवला. यासह भारतीय संघाने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.
For his captain's knock of 9⃣7⃣, @SDhawan25 bags the Player of the Match award as #TeamIndia seal a thrilling win over West Indies in the first ODI. 👌 👌 #WIvIND
Scorecard ▶️ https://t.co/tE4PtTx1bd pic.twitter.com/YsM95hV4gD
— BCCI (@BCCI) July 22, 2022
भारताची ३०० पार मजल
नाणेफेकीचा कौल यजमान संघाच्या बाजूने लागला. त्यांनी भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. कर्णधार शिखर धवन व युवा शुबमन गिल यांनी यजमान संघाच्या गोलंदाजांवर पूर्ण वर्चस्व गाजवले. दोघांनीही पहिल्या गड्यासाठी ११९ धावांची भागीदारी रचली. गिल ६७ धावांची खेळी करत धावबाद झाला. शिखर काहीसा कमनशिबी ठरला. शतकाकडे वाटचाल करत असताना ९७ धावांवर त्याला बाद व्हावे लागले. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला उतरलेल्या श्रेयस अय्यरनेही अर्धशतक साजरे केले. मात्र, त्यानंतर संघाची पडझड झाली. दीपक हूडाच्या महत्त्वपूर्ण योगदानामुळे भारतीय संघाने निर्धारित ५० षटकात ३०८ धावांपर्यंत मजल मारली.
वेस्ट इंडीजचे चोख उत्तर
तीनशे पार धावसंख्येचे आव्हान मिळाल्यानंतर अनुभवी शाई होप अवघ्या सात धावा करून माघारी परतला. त्यानंतर, कायले मायर्स व ब्रूक्स ही जोडी जमली. त्यांनी दुसऱ्या गड्यासाठी ११७ धावा जोडल्या. ४६ धावा करून ब्रूक्स बाद झाल्यावर ब्रेंडन किंगनेही अर्धशतकी खेळी केली. कर्णधार निकोलस पूरन (२५ धावा), अकील होसेन (नाबाद ३२ धावा) व रोमारिओ शेफर्ड (नाबाद ३९ धावा) यांनी देखील महत्त्वाचे योगदान दिले. परंतु, अखेरच्या षटकात मोहम्मद सिराजने १२ धावांचे रक्षण करत भारताला तीन धावांनी विजय मिळवून दिला. भारतासाठी सिराज, चहल व शार्दुल ठाकूर यांनी प्रत्येकी दोन बळी मिळवले. सामनावीर पुरस्कार कर्णधार शिखर धवन याला देण्यात आला.
महत्त्वाच्या बातम्या-
तुफानी अर्धशतकासह श्रेयस दिग्गजांच्या पंक्तीत; फोडून काढली कॅरेबियन गोलंदाजी
९७ धावांच्या लाजवाब खेळीत धवनने केले विक्रमांचे ‘शिखर’ सर