आजपासून भारत, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड महिला क्रिकेट संघांमध्ये तिरंगी टी २० मालिका रंगणार आहे.
सलामीचा सामना हा भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया असा होणार आहे.
या सामन्याला आज 10 वाजता सुरुवात झाली असून या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे.
नुकत्याच झालेल्या तीन वनडे सामन्यांच्या मालिकेत आॅस्ट्रेलियाने भारताला व्हाईटवॉश दिला आहे. त्यामुळे ह्या टी २० सामन्यात हरमनप्रीत कोैरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ या पराभवाचा कसा बदला घेईल हे पाहण्यासारखे असेल.
भारत ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या तीन संघांचा समावेश असणाऱ्या या तिरंगी मालिकेतील सर्व सामने मुंबई येथील ब्रेबॉर्न स्टेडिअमवर होणार आहेत. या सगळया सामन्यांची वेळ सकाळी 10 वाजताची आहे.
असे आहेत या मालिकेसाठी संघ:
भारत: हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृति मंधाना (उप-कर्णधार), मिताली राज, वेद कृष्णमूर्ती, जेमिमा रॉड्रिग्स, अनुजा पाटील, दिप्ती शर्मा, तनिया भाटिया (विकेटकिपर), पूनम यादव, एकता बिष्ट, झुलन गोस्वामी, शिखा पांडे , पूजा वास्तुकर, रुमेली धर, मोना मेश्राम.
ऑस्ट्रेलिया – मेग लॅनिंग (कर्णधार), रॅचेल हेन्स, निकोला कॅरी, ऍशली गार्डनर, एलिसा हिली, जेस जोनासन, डेलिसा किमॉन्स, सोफी मोलिनेक्स, बेथ मनी, एलीसे पेरी, मेगन शट, नाओमी स्टालेनबर्ग, एली विलानी, अमांडा-जेड वेलिंग्टन
तिरंगी टी २० मालिका २०१८ (भारत, ऑस्ट्रलिया आणि इंग्लंड महिला संघ)
२२ मार्च – भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया – मुंबई
२४ मार्च – ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लड – मुंबई
२६ मार्च – भारत विरुद्ध इंग्लंड – मुंबई
२८ मार्च – भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया – मुंबई
३० मार्च – ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लड – मुंबई
१ एप्रिल – भारत विरुद्ध इंग्लंड – मुंबई
३ एप्रिल – अंतिम सामना – मुंबई