नागपूर | शेवटच्या एकदिवसीय सामन्यात भारतीय महिला संघाने इंग्लडवर 8 विकेट्सने मात करत तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत 2-1 असा विजय मिळवला.
इंग्लडच्या 201 धांवाचा पाठलाग करण्यास मैदानात उतरलेल्या भारतीय महिला संघाने 45 व्या षटकांतच दोन विकेट्स गमावत लक्ष्य पुर्ण केले. भारताच्या डावाची सुरुवात काहीशी अडखळतच झाली. सुरुवातीची जोडी 7 व्या षटकातच माघारी परतली.
त्यानंतर आलेल्या मिताली राजने सर्वाधिक नाबाद 74 धावा करत डाव सावरला. तर दिप्ती शर्माने नाबाद 54 धावा व स्म्रिती मानधनाने 53 धावा करत संघाच्या विजयात महत्वाचा वाटा उचलला.
त्याआधी, प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या इंग्लड संघाने 50 षटकांत 9 विकेट्स गमावत 201 धावा केल्या. इंग्लडतर्फे अँमी जोन्सने सर्वाधिक 94 तर हेथर नाईटने 36 धावा केल्या. भारतातर्फे राजेश्वरी गायकवाड, दिप्ती शर्मा, झुलन गोस्वामी व पुनम यादवने प्रत्येकी दोन बळी घेत संघाला विजय मिळवून दिला.
दिप्ती शर्माला सामनावीर व स्म्रिती मांधनाला तिच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी मालिकावीर पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.
WATCH highlights of Player of the Match – Deepti Sharma's 54 not out in the @paytm 3rd #ODI #INDvENG : https://t.co/EkZn0EirpV pic.twitter.com/ecqdbgvY9V
— BCCI Women (@BCCIWomen) April 12, 2018
WATCH highlights of Player of the Series @mandhana_smriti's brisk half-century to set-up India's chase in the must-win @paytm 3rd #ODI #INDvENG – https://t.co/dh3PtLo6Al pic.twitter.com/Tdbdx7dVzu
— BCCI Women (@BCCIWomen) April 12, 2018
Feels great to be conferred with the Player of the series!! I would like to thank my team mates, support staff and all the fans who have always been supportive. #icc #bcci #INDvENG #odi #series #champions✌ pic.twitter.com/PjrvGyAE1u
— Smriti Mandhana (@mandhana_smriti) April 13, 2018