बांगलादेश येथे सुरू असलेल्या महिला आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत हरमनप्रीत कौर हिच्या नेतृत्वातील भारतीय महिला संघाने आपली विजयी घौडदौड कायम राखली आहे. सोमवारी (3 ऑक्टोबर) मलेशियाविरुद्ध झालेल्या सामन्यात भारतीय संघाने डकवर्थ लुईस नियमानुसार 30 धावांनी विजय मिळवला. भारताची सलामीवीर एस मेघना हिला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
Second consecutive victory for #TeamIndia in the #AsiaCup2022 as they beat Malaysia by 30 runs (DLS) 👏👏
S. Meghana bags the Player of the Match award for her terrific 6️⃣9️⃣-run knock. #INDvMAL
Scorecard 👉 https://t.co/P8ZyYS5nHl pic.twitter.com/WaV3IIgf14
— BCCI Women (@BCCIWomen) October 3, 2022
श्रीलंकेविरुद्धच्या सलामीच्या सामन्यात विजय मिळवल्यानंतर भारतीय संघाने या सामन्यात अनेक प्रमुख खेळाडूंना विश्रांती दिली. उपकर्णधार स्मृती मंधानाबरोबर स्नेह राणा, पूजा वस्त्राकर आणि रेणुका सिंग ठाकुर यांनाही आराम दिला गेला. त्यामुळे एस मेघना आणि किरण नवगिरे यांच्यासोबत राजेश्वरी गायकवाड आणि मेघना सिंग यांना अंतिम अकरामध्ये स्थान मिळाले.
पहिल्या पॉवरप्लेमध्ये मेघना व शफाली वर्मा या सलामी जोडीने 47 धावा करत संघाला चांगली सुरूवात करून दिली. मेघनाने-शेफाली यांनी पहिल्या विकेटसाठी 116 धावांची भागीदारी केली. मेघनाने अर्धशतकी खेळी केली. तिने 53 चेंडूत 69 धावा केल्या. तर शफाली 46 धावा करत बाद झाली. या सामन्यात संधी मिळालेली किरण नवगिरे ही गोल्डन डकवर बाद झाली. रिचा घोषने 19 चेंडूंवर आक्रमक 33 धावा करत संघाला 4 बाद 181 अशा मोठ्या धावसंख्येपर्यंत पोहोचवले.
दुसऱ्या डावा दरम्यान पाऊस येण्याची शक्यता असल्याने भारतीय कर्णधार हरमनप्रीतने राजेश्वरी गायकवाड व दीप्ती शर्मा या दोन्ही फिरकी गोलंदाजांकडून गोलंदाजीची सुरुवात केली. 5.2 षटकांचा खेळ झाल्यानंतर पाऊस आल्याने सामना थांबवावा लागला. पाऊस न ओसरल्याने कमीत कमी पाच षटकांचा खेळ झाला असल्यामुळे, भारतीय संघाला डकवर्थ लुईस नियमानुसार 30 धावांनी विजयी घोषित केले. भारतीय संघाला पुढील सामना युएईविरूद्ध खेळायचा आहे. त्यानंतर पाकिस्तान व बांगलादेश विरुद्ध अखेरचे दोन सामने खेळले जातील.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
रिक्षाचालकचा मुलगा काढणार दक्षिण आफ्रिकी संघाचा घाम! भारतीय संघात पहिल्यांदाच मिळालीये संधी
INDvSA: ‘सूर्याच खरा गेमचेंजर’, मॅन ऑफ द मॅच ठरलेल्या राहुलचे आश्चर्यकारक विधान
टेन्शन वाढलं! हर्षल-अक्षर आणि अर्शदीपला मिळून चोपल्या गेल्या 160 धावा