भारतीय महिला संघ 9 जुलैपासून बांगलादेश दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यावर भारतीय संघ टी20 व वनडे मालिका खेळेल. या दौऱ्यासाठी आता भारतीय संघाची घोषणा झाली असून, या 18 सदस्यीय संघात अनेक नवीन नावे दिसून येतील. अनुभवी रेणुका ठाकूर व रिचा घोष यांना संधी मिळाली नाही. तर, मागील काही काळापासून शानदार फॉर्ममध्ये असलेली अष्टपैलू श्रेयंका पाटील हिच्याकडे देखील दुर्लक्ष केले गेले आहे.
वुमेन्स प्रीमियर लीगनंतर भारतीय संघ प्रथमच मैदानावर उतरताना दिसेल. 9 जुलैपासून सुरू होणाऱ्या या दौऱ्यावर भारतीय संघ 3 वनडे व 3 टी20 सामने खेळेल. हे सर्व सामने मिरपूर येथील मैदानावर खेळले जातील. या दौऱ्यावर भारतीय संघाचे नेतृत्व हरमनप्रीत कौर हीच करेल. मागील काही काळापासून संघाच्या नियमित सदस्य असलेल्या रेणूका ठाकूर व रिचा घोष यांना संघात संधी मिळालेले नाही. तसेच, वुमेन्स प्रीमियर लीग व इमर्जिंग एशिया कपमध्ये मालिकावीर ठरलेल्या श्रेयंका पाटील हिच्याकडे देखील दुर्लक्ष केले गेले आहे.
यष्टीरक्षक प्रिया पुनिया दोन वर्षानंतर भारतीय संघात पुनरागमन करेल. तर वेगवान गोलंदाज अंजली सरवानी हिची टी20 संघातील जागा कायम राहिली आहे. अमनजोत कौर ही देखील प्रथमच भारताच्या वनडे संघात सामील होईल. तर फिरकीपटू मोनिका पटेलला प्रथमच भारतीय संघात संधी देण्यात आली आहे.
भारताचा टी20 संघ: हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), दीप्ती शर्मा, शफाली वर्मा, जेमिमाह रॉड्रिग्स, यास्तिका भाटिया (यष्टीरक्षक), हरलीन देओल, देविका वैद्य, उमा छेत्री (यष्टीरक्षक), अमनजोत कौर, एस. मेघना, पूजा वस्त्रकार, मेघना सिंग, अंजली सरवानी, मोनिका पटेल, राशी कनोजिया, अनुषा बरेड्डी, मिन्नू मणी.
भारताचा वनडे संघ: हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), दीप्ती शर्मा, शफाली वर्मा, जेमिमाह रॉड्रिग्स, यास्तिका भाटिया (यष्टीरक्षक), हरलीन देओल, देविका वैद्य, उमा छेत्री (यष्टीरक्षक), अमनजोत कौर, प्रिया पुनिया, पूजा वस्त्रकार, मेघना सिंग, अंजली सरवानी, मोनिका पटेल, राशी कनोजिया, अनुषा बरेड्डी, स्नेह राणा.
(India Womens Sqaud For Bangaladesh Tour Renuka Richa Ignored)
महत्वाच्या बातम्या –
पीवायसी रिअल्टी सेव्हन चेस लीग स्पर्धेत तिसऱ्या फेरीअखेर मराठा वॉरियर्स आघाडीवर
वानखेडेवर रंगणार 2011 वर्ल्डकप फायनलचा रिमेक! असे आहे श्रीलंका संघाचे वेळापत्रक