---Advertisement---

खळबळजनक बातमी: क्वार्टर फायनल खेळत असलेल्या भारतीय संघाचे प्रशिक्षकच झाले गायब!

---Advertisement---

भारतीय महिला टेबल टेनिस संघाला बर्मिंघम येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत मलेशियाकडून पराभवाचा सामना करावा लागला. भारतीय संघ येथे आपले विजेतेपद राखण्यासाठी आला होता. मात्र, संघाला उपांत्यपूर्व फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले. या पराभवासोबतच भारतीय टेबल टेनिस संघासोबत एका नव्या वादाची भर पडली आहे. बाद फेरीच्या या महत्त्वाच्या सामन्यादरम्यान संघाचे प्रशिक्षक अनिंदित चक्रवर्ती उपस्थित नव्हते. ज्यावर प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.

चक्रवर्ती हे अनुपस्थितीत असल्याने या सामन्यादरम्यान पुरुष संघाचे प्रशिक्षक एस रमण खेळाडूंना मार्गदर्शन करताना दिसून आले. भारतीय टेबल टेनिस असोसिएशनच्या प्रशासकीय समितीचे सदस्य एस.डी. मौदगील म्हणाले की, “असे घडायला नको होते. अति महत्त्वाच्या सामन्यादरम्यान अनिंदित चक्रवर्ती उपस्थित असायला हवे होते. याप्रकरणी संघाशी बोलणार आहे.”

संघाला मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित असलेले प्रशिक्षक रमन हे भारताचा स्टार खेळाडू जी साथियान याचे वैयक्तिक प्रशिक्षक आहेत. भारत आणि मलेशिया यांच्यातील सामना अतिशय चुरशीचा झाला. त्यावेळी ते रित रिश्याला मार्गदर्शन करताना दिसले. पराभवानंतर संघाची सर्वात अनुभवी खेळाडू मनिका बत्रा मीडियाशी बोलण्यासाठीही थांबली नाही. सामना संपल्यानंतर रमन म्हणाले की, सामना अगदी जवळ आला होता. संयोजन अगदी वेगळे होते. बचावात्मक, डावखुरा आणि उजवा हात यांचं संयोजन खूपच आव्हानात्मक होते.

राष्ट्रकुल २०२२ स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच भारतीय पथकात प्रशिक्षकावरून वाद सुरू झाला होता. बॉक्सर लवलिना बोर्गोहेनच्या वैयक्तिक प्रशिक्षकाच्या मान्यतेबाबत यापूर्वी बराच वाद झाला होता. हा वाद थांबून काही दिवसच उलटले होते की, आता महिला टेबल टेनिस संघाच्या प्रशिक्षकाबाबत वाद सुरू झाला आहे. या सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, भारताला उपांत्यपूर्व फेरीत मलेशियाकडून ३-२ असा पराभव पत्करावा लागला होता. या पराभवासह संघ २०२२ राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतूनही बाहेर पडला.

महत्त्वाच्या ‌‌‌‌‌‌बातम्या-

CWG 2022 | कॉमनवेल्थ गेम्समध्ये सायकलस्वारांनी सोडला ट्रॅक, पाहा भीषण अपघाताचा व्हिडिओ

न्यूझीलंड कर्णधाराच्या मनात निवृत्तीचा विचार? दिले स्पष्टीकरण

पहिल्या टी-२० विजयानंतर टीम इंडियाचा विशेष सन्मान, रोहितला मिळाले स्पेशल गिफ्ट

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---