दक्षिण आफ्रिका येथे सुरू असलेल्या महिला टी20 विश्वचषकात शनिवारी (18 फेब्रुवारी) भारत विरुद्ध इंग्लंड सामना सुरू झाला. भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौर हिने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. या सामन्यासाठी भारतीय संघात वेगवान गोलंदाज शिखा पांडे हिला संधी देण्यात आली.
🚨 Toss Update & Team News 🚨#TeamIndia have elected to bowl against England.
Follow the match 👉 https://t.co/EvGQ5Eom80#T20WorldCup | #ENGvIND
1️⃣ change to our Playing XI as @shikhashauny is named in the team 🔽 pic.twitter.com/hRKWAirAx7
— BCCI Women (@BCCIWomen) February 18, 2023
ब गटातील आपल्या पहिल्या दोन सामन्यात भारतीय संघाने विजय मिळवलेला. भारताने पाकिस्तान व वेस्टइंडीजला मात्र देत चांगली सुरुवात केली. दुसरीकडे इंग्लंडने देखील आपल्या पहिले दोन्ही सामन्यात विजय मिळवला आहे. या सामन्यात इंग्लंडने आपल्या संघात एकही बदल केला नाही. दुसरीकडे भारतीय संघाने अष्टपैलू देविका वैद्य हिच्या जागी अनुभवी वेगवान गोलंदाज शिखा पांडे हिला संधी दिली.
हा सामना जिंकून भारतीय संघ पहिल्या क्रमांकावर जाण्याचा प्रयत्न करेल. गटातील पहिले दोन संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरणार आहेत.
इंग्लंड महिला (प्लेइंग इलेव्हन): सोफिया डंकले, डॅनिएल व्याट, ऍलिस कॅप्सी, नॅट सिव्हर ब्रंट, हीदर नाइट (कर्णधार), एमी जोन्स (यष्टीरक्षक), कॅथरीन सिव्हर ब्रंट, सोफी एक्लस्टन, चार्ली डीन, सारा ग्लेन, लॉरेन बेल.
भारतीय महिला (प्लेइंग इलेव्हन): शफाली वर्मा, स्मृती मंधाना, जेमिमा रॉड्रिग्स, हरमनप्रीत कौर (कर्णधार), रिचा घोष (यष्टीरक्षक), शिखा पांडे, दीप्ती शर्मा, पूजा वस्त्राकर, राधा यादव, राजेश्वरी गायकवाड, रेणुका ठाकूर सिंग.
बातमी अपडेट होत आहे
(India Womens Won Toss And Elected To Bowl First Against England In Womens T20 World Cup)