भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा आणि महत्वाचा टी२० सामना आज शुक्रवारी (दि.१७ जून) राजकोट येथील सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर संपन्न झाला. एकूण पाच सामन्यांच्या टी२० मालिकेतील हा चौथा सामना भारतासाठी अतिशय महत्वाचा होता. याचे कारण ५ सामन्यांच्या मालिकेत दक्षिण आफ्रिकेचा संघ अगोदरच २-१ असा आघाडीवर होता. त्यानंतर या ‘करो वा मरो’ च्या सामन्यांत भारताने विजय मिळवत मालिकेत २-२ अशी बरोबरी केली आहे.
दक्षिण आफ्रिका संघाने या सामन्यात नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात भारताने कोणताही बदल केला नाही. मात्र, दक्षिण आफ्रिकेच्या लसंघाने तीन बदल केले. प्रथम फलंदाजी करत असताना भारताच्या फलंदाजांनी निराश केले. सर्वात आधी ऋतुराज गायकवाड, त्यानंतर श्रेयस अय्यर, रिषभ पंत, आणि इशान किशनने देखील अपेक्षेप्रमाणे कामगिरी केली नाही. त्यानंतर मात्र, दिनेश कार्तिक आणि हार्दिक पंड्याने डाव सावरला. कार्तिकने त्याच्या कारकिर्दीतील -पहिले अर्धशतक झळकावत भारतासाठी सर्वाधिक धावा केल्या. कार्तिक आणि पंड्याच्या खेळीच्या जोरावर भआरताने प्रथम फलंदाजी करत १६९ धावा उभारल्या.
या भारताने दिलेल्या १७० धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेची सुरुवात देखील काही खास झाली नाही. कर्णधार टेम्बा बवुमाला दुखापत झाल्याने तो रिटायर्ड होऊन बाहेर गेला. त्यानंतर क्विंटन डिकॉक डाव सावरेल असे वाटत असराना तो धावबाद झाला. त्यानंतर मात्र, भारतीय गोलंदाजांचे नियंत्रण संपूर्ण सामन्यावर राहिले. शेवटी दक्षिण आफ्रिकेचा संघ ९ बाद केवळ ८७ धावा करण्यात यशस्वी झाला आणि भारतीय संघाला चौथ्या सामन्यात ८२ धावांनी विजय मिळाला. यावेळी भारताकडून गोलंदाजी करत असताना आवेश खान याने सर्वाधिक ४ बळी घेतले. याशिवाय चहलने २ तर हर्षल पटेल आणि अक्षर पटेलने प्रत्येकी १ बळी घेतले.
दरम्यान, या मालिकेचा पाचवा आणि निर्णायक सामना रविवारी दि. १९ जून रोजी बंगळूरू येथे खेळला जाणार आहे. सध्या ही मालिका २-२ अशी बरोबरीत आहे. अशातच आजच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बवुमाला गंभीर दुखापत झाल्याचे वृत्त समोर आले आहे. त्यामुळे पुढील सामन्यात भारताचे पारडे जड असण्याची आशा आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
कार्तिक जोमात आफ्रिका कोमात! तब्बल १६ वर्षांनंतर लगावले पहिले टी२० अर्धशतक
मॉर्गनचं ठरलंय! लवकरच क्रिकेटपासून दूर होण्याचे दिले संकेत
सिक्स आणि बॉल गायब! इंग्लंडच्या फलंदाजाच्या जबरदस्त षटकाराचा परिणाम एकदा बघाच