पाकिस्तान संघाला पराभूत केल्यानंतर झिम्बाब्वे संघाचा आत्मविश्वास गगनाला भिडलेला होता. मात्र, हा आत्मविश्वास धुळीस मिळवण्याचे काम भारतीय संघाने रविवारी (दि. 06 नोव्हेंबर) केले. ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्न क्रिकेट मैदानावर पार पडलेल्या टी20 विश्वचषक 2022 स्पर्धेच्या सुपर 12 फेरीतील शेवटचा म्हणजेच 42 वा सामना भारत विरुद्ध झिम्बाब्वे संघात पार पडला. हा सामना भारताने 71 धावांनी आपल्या नावावर केला. आता भारतीय संघ विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यात इंग्लंडविरुद्ध दोन हात करेल.
या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याने नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला होता. हा निर्णय भारतीय फलंदाजांनी सार्थ ठरवला. यावेळी भारताने निर्धारित 20 षटकात 5 विकेट्स गमावत 186 धावा चोपल्या होत्या. भारताचे 187 धावांचे आव्हान पार करताना झिम्बाब्वेच्या फलंदाजांच्या नाकी नऊ आल्या. यावेळी झिम्बाब्वे संघाचा डाव 115 धावांवर संपुष्टात आला.
For his breathtaking batting pyrotechnics, @surya_14kumar bagged the Player of the Match award as #TeamIndia beat Zimbabwe by 7⃣1⃣ runs at the MCG👏 👏
Scorecard 👉 https://t.co/shiBY8Kmge #T20WorldCup | #INDvZIM pic.twitter.com/k236XjavDv
— BCCI (@BCCI) November 6, 2022
बांगलादेशकडून फलंदाजी करताना रायन बर्ल (Ryan Burl) याने सर्वाधिक धावा केल्या. त्याने यावेळी 1 षटकार आणि 5 चौकारांचाही पाऊस पाडला. त्याच्याव्यतिरिक्त सिकंदर रझा याने 34 धावांचे योगदान दिले. कर्णधार क्रेग इर्विन (13) आणि शॉन विलियम्स (11) धावा करू शकले. इतर एकाही फलंदाजाला दोन आकडी धावसंख्या पार करता आली नाही.
यावेळी भारताकडून गोलंदाजी करताना सहाच्या सहा गोलंदाजांनी विकेट्स घेतल्या. यामध्ये सर्वाधिक विकेट्स आर अश्विन याच्या पारड्यात पडल्या. त्याने 4 षटके गोलंदाजी करताना 22 धावा देत 3 विकेट्स घेतल्या. त्याच्याव्यतिरिक्त हार्दिक पंड्या आणि मोहम्मद शमी यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तसेच, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाकडून सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) याने सर्वाधिक धावा केल्या. त्याने 25 चेंडूत 61 धावा चोपल्या. या धावा करताना त्याने 4 षटकार आणि 6 चौकारही मारले. त्याच्याव्यतिरिक्त केएल राहुल यानेही 51 धावा करत अर्धशतक साकारले. तसेच, विराट कोहली (26), हार्दिक पंड्या (18) आणि रोहित शर्मा (15) यांनीही महत्त्वपूर्ण योगदान दिले.
यावेळी झिम्बाब्वेकडून गोलंदाजी करताना चार गोलंदाजांना विकेट्स घेण्यात यश आले. शॉन विलियम्स याने सर्वाधिक विकेट्स घेतल्या. त्याने 2 षटकात 9 धावा देत 2 विकेट्स घेण्याची कामगिरी केली. त्याच्याव्यतिरिक्त सिकंदर रझा, ब्लेसिंग्स मुझरबानी आणि रिचर्ड नगारवा यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
या विजयानंतर भारतीय संघ गुणतालिकेत अव्वलस्थानी पोहोचला आहे. भारताचे 5 सामन्यांनंतर 8 गुण झाले आहेत. यामध्ये भारताचा एकूण नेट रनरेट हा +1.319 इतका आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
अविश्वसनीय! विराटने घेतला झिम्बाब्वेच्या सलामीवीराचा अफलातून कॅच, व्हिडिओ वेधतोय सर्वांचे लक्ष
‘सूर्य’ पुन्हा तळपला, वादळी अर्धशतकासह मोठा विक्रम नावावर; ठरलाय एकटाच भारतीय