---Advertisement---

गुवाहाटी वनडेवर टीम इंडियाची मोहोर! सांघिक कामगिरीच्या जोरावर मिळवला विजय, शनाकाची एकाकी झुंज

On: मंगळवार, जानेवारी 10, 2023 9:35 PM
---Advertisement---

भारत आणि श्रीलंका यांच्या दरम्यानचा पहिला वनडे सामना मंगळवारी (10 जानेवारी) पार पडला. गुवाहाटी येथे खेळला गेलेल्या सामन्यात भारतीय संघाने श्रीलंकेचा 67 धावांनी पराभूत करत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. भारतीय संघासाठी विराट कोहलीने शतक झळकावल्यानंतर श्रीलंकेसाठी कर्णधार दसून शनाकाने नाबाद शतक झळकावत एकाकी झुंज दिली.

https://twitter.com/BCCI/status/1612839676544716802?t=j4RK1Y9P88lXHTBsX8KMJA&s=19

 

नव्या वर्षातील पहिल्याच वनडे मालिकेतील पहिला सामना बारसपारा स्टेडियम येथे खेळला गेला. या सामन्यातून भारतीय संघात कर्णधार रोहित शर्मा व विराट कोहली यांनी पुनरागमन केले. श्रीलंकन कर्णधाराने नाणेफेक जिंकत भारतीय संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. रोहित शर्मा व शुबमन गिल या सलामी जोडीने 143 धावांची सलामी दिली. दोघांनी अनुक्रमे 83 व 70 धावा केल्या.

तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या विराट कोहलीने त्यानंतर डावाची सूत्रे आपल्या हाती घेत श्रीलंकन गोलंदाजांना दबावात आणले. त्याने अतिशय आक्रमक रूप धारण करत आपले अर्धशतक पूर्ण केले. निर्धाव चेंडू न खेळता त्याने आधी केएल राहुलसह 90 धावांची भागीदारी केली. विराटने बाद होण्यापूर्वी भारतीय संघाला 350 धावांचा टप्पा पार करून देत 87 चेंडूंमध्ये 113 धावांची शानदार खेळी साकारली. त्यामुळेच भारतीय संघ 7 बाद 373 अशी मजल मारू शकला.

या धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेने 64 धावांमध्ये आपले तीन बळी गमावले. मोहम्मद सिराजने यातील दोन बळी आपल्या नावे केले. मात्र, सलामीवीर पथुम निसंकाने 72 धावा करत श्रीलंकेला सामन्यात कायम ठेवले. ‌युवा वेगवान गोलंदाज उमरान मलिक याने मधल्या फळीतील तीन बळी मिळवत भारताला पुनरागमन करून दिले. मात्र, त्यानंतर श्रीलंकेचा कर्णधार दसून शनाका खेळपट्टीवर अडून बसला. त्याने नवव्या गड्यासाठी कसून रजिथासह 90 धावांची भागीदारी करत एकाकी झुंज दिली.‌ शनाकाने अखेरपर्यंत नाबाद ‌‌राहत 108 धावा काढल्या. शानदार शतकासाठी विराट कोहलीला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.

(India Won First ODI Against Srilanka By 67 Runs Virat And Shanaka Century)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
श्रीलंकेविरुद्ध भारतीयांची बॅट नेहमीच तळपते, पण ‘या’ भारतीयांनी केलेत बाप रेकॉर्ड, कोहली नंबर 1
मायदेशात विराटचेच राज! सचिनला पछाडत पोहोचलाय दुर्मिळ विक्रमात अव्वलस्थानी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---