---Advertisement---

BREAKING: चक दे इंडिया! भारतीय हॉकी संघाने एशियन गेम्समध्ये केला सुवर्णपदकावर कब्जा, जपानचा उडवला धुव्वा

On: शुक्रवार, ऑक्टोबर 6, 2023 6:02 PM
---Advertisement---

चीनमधील हॅंगझू येथे सुरू असलेल्या एशियन गेम्स स्पर्धेत शुक्रवारी (6 ऑक्टोबर) भारतीय पुरूष हॉकी संघाने ऐतिहासिक कामगिरी नोंदवली. हरमनप्रीत ‌सिंग याच्या नेतृत्वातील भारतीय संघाने अंतिम सामन्यात जपानचा 5-1 असा पराभव करत सुवर्णपदक आपल्या नावे केले. भारतीय संघाने स्पर्धेत सलग सात विजय मिळवत हे सुवर्णपदक जिंकले.

संपूर्ण स्पर्धेत चमकदार कामगिरी केलेल्या भारतीय संघाने या अंतिम सामन्यात देखील आक्रमक सुरुवात केली होती. मात्र, पहिल्या क्वार्टरमध्ये दोन्ही संघ गोल करण्यात अपयशी ठरले. दुसऱ्या क्वार्टरमध्ये 25 व्या मिनिटाला मनप्रीत सिंग याने गोल करत भारताचे खाते उघडले. त्यानंतर तिसऱ्या क्वार्टरमध्ये 32 व्या मिनिटाला कर्णधार हरमनप्रीतने तर 36 व्या मिनिटाला अमित रोहिदास यांनी गोल करत भारताची आघाडी वाढवली. 48 व्या मिनिटाला अभिषेक याने देखील गोल झळकावला.

अखेरच्या क्वार्टरमध्ये 51 व्या मिनिटाला तनाकाने जपानसाठी एकमेव गोल केला. त्यानंतर कर्णधार हरमनप्रीतने 58 व्या मिनिटाला आणखी एक गोल करत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

(India Won Gold Medal In Hockey In Asian Games 2023)

महत्वाच्या बातम्या – 
दुसऱ्या सेमीफायनलमध्ये पाकिस्तानला चिरडत अफगाणिस्तानचा जबरदस्त विजय, अंतिम सामन्यात ऋतुराजसेनेशी भिडणार
विश्वचषकाच्या दुसऱ्या सामन्यात नेदरलँडने जिंकला टॉस; बाबर म्हणाला, ‘आम्ही आज 300…’

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---