इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यात शनिवारी (०९ जुलै) ऍजबस्टन येथे दुसरा टी२० सामना झाला. भारतीय संघाने पुन्हा एकदा या सामन्यात धडाकेबाज प्रदर्शन करत ४९ धावांनी विजय मिळवला. या विजयासह भारतीय संघाने ३ सामन्यांची टी२० मालिका २-० अशा फरकाने जिंकली आहे.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने निर्धारीत २० षटकात ८ विकेट्सच्या नुकसानावर १७० धावा केल्या. प्रत्युत्तरात इंग्लंडचा संघ १२१ धावाच करू शकला.
भारताच्या १७१ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडच्या फलंदाजांच्या नाकी नऊ आले. इंग्लंडकडून फक्त २ फलंदाजांना २० पेक्षा जास्त धावा करता आल्या. मोईन अलीने ३५ धावा आणि डेविड विलीने नाबाद ३३ धावा केल्या. इंग्लंडचे उरलेले ७ फलंदाज एकेरी धावेवर बाद झाले. परिणामी इंग्लंडचा संघ १७ षटकातच १२१ धावांवर गुंडाळला गेला.
इंग्लंडला कमी धावसंख्येवर रोखण्यात भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह आणि युझवेंद्र चहल यांचा मोठा वाटा राहिला. भुवनेश्वरने ३ षटके फेकताना १५ धावा देत ३ विकेट्स घेतल्या. तसेच बुमराहने आणि चहलने प्रत्येकी २ फलंदाजांना बाद केले.
https://twitter.com/englandcricket/status/1545812091046711296?s=20&t=JWQMGbr9S96a6cKDJjNsYA
तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाला आक्रमक सुरुवात मिळाली होती. कर्णधार रोहित शर्मा आणि रिषभ पंत यांच्यात पहिल्या विकेटसाठी ४९ धावांची भागीदारी झाली. रोहितने २ षटकार आणि ३ चौकारांच्या मदतीने २० चेंडूत ३१ धावा केल्या. तर पंतने १ षटकार आणि ४ चौकारांच्या मदतीने २६ धावांची खेळी केली. त्यानंतर भारताची फलंदाजी फळी कोलमडली. मात्र अष्टपैलू रविंद्र जडेजाने फिनिशरची भूमिका बजावत संघाला संकटातून बाहेर काढले.
जडेजाने २९ चेंडूत नाबाद ४६ धावांची झुंजार खेळी खेळली. या खेळीदरम्यान त्याने ५ चौकार मारले. त्याच्या या झंझावाती खेळीच्या जोरावर भारतीय संघाने १७० धावा फलकावर लावल्या होत्या.
या डावात इंग्लंडचा पदार्पणवीर रिचर्ड ग्लीसनने भारतीय संघाला धक्क्यावर दिले. तसेच ख्रिस जॉर्डननेही आपल्या भेदकतेचा नमुना सादर केला. रिचर्डने ४ षटके फेकताना १५ धावा देत ३ विकेट्स घेतल्या. तर जॉर्डनने ४ फलंदाजांना तंबूत पाठवले. २७ धावा देत त्याने या विकेट्स घेतल्या.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
इंग्लंड संघाचे कसोटीही टी२० प्रमाणे खेळण्याचे गुपित उलगडले, खुद्द बेयरस्टोने सांगितलंय
अखेर मुहूर्त लागला! तब्बल ६ वर्षांनंतर भारतीय संघ जाणार ‘या’ देशाच्या दौऱ्यावर
रविंद्र जडेजा आणि चेन्नई सुपर किंग्जचं ‘ब्रेकअप’? फ्रँचायझीकडून मोठं विधान आलं पुढे






