भारत आणि श्रीलंका (India vs Sri Lanka) संघातील ३ सामन्यांच्या टी२० मालिकेतील पहिला सामना गुरुवारी (२४ फेब्रुवारी) लखनऊ येथील एकाना स्टेडिअमवर पार पडला. हा सामना भारतीय संघाने ६२ धावांनी खिशात घातला. विशेष म्हणजे हा भारताचा आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमधील सलग १० वा विजय होता. भारताने भारताच्या या विजयाचा शिल्पकार इशान किशन (Ishan Kishan) ठरला. त्याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. इशानने सर्वाधिक धावा कुटल्या. या सामन्यात भारतासाठी फलंदाजांसोबतच आणि गोलंदाजांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले.
या सामन्यात श्रीलंका संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेत भारतीय संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. यावेळी प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने २ विकेट्स गमावत निर्धारित २० षटकात १९९ धावांचा डोंगर उभा केला होता आणि श्रीलंकेला २०० धावांचे भले मोठे आव्हान दिले होते.
That's that from the 1st T20I.#TeamIndia win by 62 runs and go 1-0 up in the three-match series.
Scorecard – https://t.co/RpSRuIlfLe #INDvSL @Paytm pic.twitter.com/S2EoR9yesm
— BCCI (@BCCI) February 24, 2022
या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंका संघाला ६ विकेट्स गमावत निर्धारित २० षटकात १३७ धावाच करता आल्या. यावेळी श्रीलंकेकडून फलंदाज चरिथ असलंकाने सर्वाधिक धावा केल्या. त्याने ४७ चेंडूत ५ चौकारांच्या मदतीने ५१ धावा कुटल्या. चरिथव्यतिरिक्त दुशमंता चमीरा (२४) आणि चमिका करुणारत्ने (२१) या दोन खेळाडूंनाच २० धावांचा आकडा पार करता आला. इतर खेळाडूंना फार चांगल्या धावा करता आल्या नाहीत.
यावेळी भारताकडून गोलंदाजी करताना भुवनेश्वर कुमार आणि वेंकटेश अय्यर या दोन गोलंदाजांनी प्रत्येकी २ विकेट्स आपल्या नावावर केल्या. तसेच युझवेंद्र चहल आणि रवींद्र जडेजाने प्रत्येक १ विकेट आपल्या खिशात घातली.
तत्पूर्वी भारतीय संघाकडून फलंदाजी करताना इशान किशनने सर्वाधिक धावा केल्या होत्या. त्याने ५६ चेंडूंचा सामना करताना ८९ धावा कुटल्या होत्या. या धावा करताना त्याने ३ षटकार आणि १० चौकार ठोकले. त्याच्याव्यतिरिक्त श्रेयस अय्यरने २८ चेंडूत ५७ धावा करत आपले अर्धशतक पूर्ण केले. यात २ षटकार आणि ५ चौकारांचा समावेश होता. तसेच कर्णधार रोहित शर्माने ३२ चेंडूत ४४ धावा केल्या. त्यानेही या धावा करताना १ षटकार आणि २ चौकार ठोकले.
यावेळी श्रीलंकेकडून गोलंदाजी करताना लहिरू कुमारा आणि कर्णधार शनाकाने प्रत्येकी १ विकेट घेतली.
आता भारत आणि श्रीलंका संघातील उर्वरित २ टी२० सामने २६ आणि २७ फेब्रुवारी रोजी धरमशाला येथे खेळले जाणार आहेत.
महत्वाच्या बातम्या-
दीपक हुडा तिसऱ्यांदा भाग्यशाली; २ वेळा संधी हुकल्यानंतर, अखेर श्रीलंकेविरुद्ध केले टी२० पदार्पण