भारत विरूद्ध इंग्लंड (India vs England) संघात 5 सामन्यांच्या टी20 मालिकेतील पहिला टी20 सामना कोलककाताच्या ईडन गार्डन्स मैदानावर खेळला गेला. या सामन्यात भारताने इंग्लंडचा 7 गडी राखून धुव्वा उडवत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. या सामन्यात अभिषेक शर्माने (Abhishek Sharma) भारतासाठी तुफानी खेळी केली. दरम्यान त्याने 79 धावा ठोकल्या. तर भारतासाठी वरुण चक्रवर्ती (Varun Chakaravarthy) आणि अर्शदीप सिंग (Arshdeep Singh) यांनी दमदार गोलंदाजी केली.
इंग्लंडने दिलेल्या 133 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या भारतीय संघाकडून संजू सॅमसन (Sanju Samson) आणि अभिषेक शर्मा (Abhishek Sharma) यांनी सलामी दिली. दरम्यान, सॅमसन 26 धावा करून बाद झाला. तर कर्णधार सूर्यकुमार यादवला (Suryakumar Yadav) खातेही उघडता आले नाही. त्याला जोफ्रा आर्चरने शून्यावर बाद केले. अभिषेकने शानदार कामगिरी केली आणि 79 धावांची खेळी केली. तिलक वर्मा (Tilak Verma) 19 धावा करून नाबाद राहिला. हार्दिक पांड्या (Hardik Pandya) 3 धावा करून नाबाद राहिला. भारताने 12.5 षटकांत विजय मिळवला.
भारताकडून अभिषेक शर्माने सामना जिंकणारी खेळी केली. त्याने केवळ 20 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. अभिषेकने 34 चेंडूंचा सामना करत विस्फोटक अंदाजात फलंदाजी करत 79 धावा केल्या. दरम्यान त्याने 5 चौकारांसह 8 षटकार लगावले. इंग्लंडकडून जोफ्रा आर्चरने (Jofra Archer) चांगली गोलंदाजी केली. त्याने 2 विकेट्स घेतल्या.
प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने 132 धावा केल्या. संघाची सुरुवात खूपच खराब झाली. सलामीवीर फिल साल्ट शून्यावर बाद झाला. तर बेन डकेट 4 धावा करून तंबूत परतला. पण कर्णधार जोस बटलरने (Jos Buttler) डाव सांभाळत अर्धशतक झळकावले. बटलरने 68 धावांची खेळी केली. दरम्यान त्याने 8 चौकारांसह 2 षटकार ठोकले.
ईडन गार्डन्सवर भारतीय संघाचे गोलंदाज चमकले. फिरकीपटू वरुण चक्रवर्तीने 3 विकेट्स घेतल्या. वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने 4 षटकांत 17 धावा देत 2 विकेट्स घेतल्या. तर फिरकीपटू अक्षर पटेलने 2 विकेट्स घेतल्या आणि हार्दिक पांड्याही 2 विकेट्स घेण्यात यशस्वी ठरला.
महत्त्वाच्या बातम्या-
IND vs ENG; अर्शदीप सिंगने रचला इतिहास, अशी कामगिरी करणारा ठरला पहिलाच भारतीय
आयसीसी कसोटी क्रमवारी जाहीर…! जसप्रीत बुमराहचे वर्चस्व, तर जडेजाही अव्वल स्थानी
भारतीय संघाच्या जर्सीवर पाकिस्तानचे नाव असणार की नाही? BCCIच्या सचिवांनी दिले उत्तर