भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) संघात 4 सामन्यांची टी20 मालिका खेळली जात आहे. त्यातील 3 सामने खेळले गेले. या मालिकेत भारताने वर्चस्व गाजवले आहे. भारत या मालिकेत 2-0 ने पुढे आहे. आता या मालिकेतील चौथा आणि शेवटचा सामना आज (15 नोव्हेंबर) रोजी वांडरर्स स्टेडियम खेळला जाणार आहे. भारत सूर्यकुमार यादवच्या (Suryakumar Yadav) नेतृत्वाखाली, तर दक्षिण आफ्रिका संघ एडन मार्करमच्या (Aiden Markram) नेतृत्वाखाली मेदानात उतरणार आहे.
पहिल्या 3 सामन्यांबद्दल बोलायचे झाले, तर पहिल्या सामन्यात भारताने वर्चस्व गाजवत 61 धावांनी विजय मिळवला. दुसऱ्या सामन्यात आफ्रिकेने पलटवार करत 3 विकेट्सने विजय मिळवला आणि मालिकेत 1-1 अशी बरोबरी केली. पण तिसऱ्या सामन्यात भारताने 11 धावांनी विजय मिळवत मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली.
तिसऱ्या सामन्यासाठी दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन-
भारत- संजू सॅमसन (यष्टीरक्षक), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), हार्दिक पांड्या, रिंकू सिंह, रमणदीप सिंग, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, रवी बिश्नोई, वरुण चक्रवर्ती
दक्षिण आफ्रिका-रायन रिकेल्टन, रीझा हेंड्रिक्स, एडन मारक्रम(कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, हेनरिक क्लासेन(यष्टीरक्षक), डेव्हिड मिलर, मार्को जॅन्सन, जेराल्ड कोएत्झी, अँडिले सिमेलेन, केशव महाराज, लुथो सिपामला
महत्त्वाच्या बातम्या-
“बुमराह सर्व 5 कसोटी सामने खेळेल असं वाटत नाही”, माजी प्रशिक्षकाचं धक्कादायक वक्तव्य
सीएसकेच्या माजी खेळाडूनं ठोकलं शानदार द्विशतक, शमीनंही दाखवला फलंदाजीत दम
“जग काय मुर्ख आहे…” चॅम्पियन्स ट्राॅफी वादावर माजी पाकिस्तान खेळाडूचे मोठे वक्तव्य!