---Advertisement---

टॉसचा निकाल भारताच्या पारड्यात! दोन धुरंधरांचे पुनरागमन, तर ईशानचाही ताफ्यात समावेश

On: बुधवार, जानेवारी 18, 2023 1:18 PM
IND-vs-NZ
---Advertisement---

न्यूझीलंड संघ भारत दौऱ्यावर आला आहे. या दौऱ्यात न्यूझीलंडला भारताविरुद्ध 3 वनडे आणि 3 टी20 सामन्यांची मालिका खेळायची आहे. या मालिकेतील पहिला सामना बुधवारी (दि. 18 जानेवारी) हैदराबाद येथे खेळला जाणार आहे. सामन्याला सुरुवात होण्यापूर्वी उभय संघात नाणेफेक झाली. ही नाणेफेक भारतीय संघाने जिंकली असून फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. तसेच, भारतीय संघात महत्त्वाचे बदल झाले आहेत.

भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) संघातील पहिल्या वनडे सामन्यासाठी भारतीय संघात तीन बदल झाले आहेत. कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याने हार्दिक पंड्या आणि शार्दुल ठाकूर संघात परतले आहेत. तसेच, सूर्यकुमार यादव आणि ईशान किशन हेदेखील चांगल्या लयीत खेळत आहेत.

याव्यतिरिक्त न्यूझीलंड संघाकडून 3 वेगवान गोलंदाज आणि 2 फिरकीपटू पहिल्या वनडे सामन्यात भारताविरुद्ध खेळताना दिसणार आहेत. (India won the toss and opt to bat against new zealand)

पहिल्या वनडे सामन्यासाठी उभय संघांची प्लेइंग इलेव्हन
भारतीय संघ-
रोहित शर्मा (क), शुबमन गिल, विराट कोहली, इशान किशन, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी.

न्यूझीलंड संघ-
फिन ऍलन, डेवॉन कॉनवे, हेन्री निकोल्स, डॅरिल मिचेल, टॉम लॅथम (यष्टीरक्षक/कर्णधार), ग्लेन फिलिप्स, मायकेल ब्रेसवेल, मिशेल सँटनर, हेन्री शिपले, लॉकी फर्ग्युसन, ब्लेअर टिकनर

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
सरफराजने शतक ठोकल्यानंतर ‘सिद्धू मूसेवाला’च्या अंदाजात केले सेलिब्रेशन, व्हिडिओ जोरदार व्हायरल
टीम इंडियाच्या माजी कर्णधारावर गुन्हा दाखल; महाराष्ट्रातील बड्या राजकीय नेत्याशी संबंध

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---