भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांच्या टी20 मालिकेला बुधवारी (28 सप्टेंबर) तिरुअनंतपुरम येथे सुरुवात झाली. ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिका जिंकल्यानंतर भारतीय संघाने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. आशिया चषकानंतर डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग तसेच रिषभ पंत याने संघात पुनरागमन केले आहे.
1ST T20I. India won the toss and elected to field. https://t.co/yQLIMooZxF #INDvSA @mastercardindia
— BCCI (@BCCI) September 28, 2022
ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळलेल्या भारतीय संघात यापूर्वी काही बदल करण्यात आले होते. अंतिम सामन्यात खेळलेल्या हार्दिक पंड्या व भुवनेश्वर कुमार यांना राष्ट्रीय क्रिकेट अकादमी पाठवण्यात आले आहे. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यातून प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याला हलकीशी दुखापत झाल्यामुळे माघार घ्यावी लागली. रविचंद्रन अश्विन याला युजवेंद्र चहलच्या जागी संधी देण्यात आली. दीपक चहर व अर्शदीप सिंग यांनाही संघात स्थान मिळाले. हार्दिकच्या जागी रिषभ पंतने संघात पुनरागमन केले.
दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन–
भारत– रोहित शर्मा (कर्णधार), दिनेश कार्तिक, केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, अक्षर पटेल, अर्शदीप सिंह, हर्षल पटेल, रविचंद्रन अश्विन, दीपक चहर
🚨 Team News 🚨
A look at #TeamIndia's Playing XI for the first #INDvSA T20I 🔽
Follow the match ▶️ https://t.co/L93S9jMHcv pic.twitter.com/Uay6kuQJbE
— BCCI (@BCCI) September 28, 2022
दक्षिण आफ्रिका– टेंबा बवुमा (कर्णधार), क्विंटन डी कॉक, ट्रिस्टन स्टब्स, रिझा हेंड्रिक्स, रायली रूसो, ऐडन मार्करम, डेव्हिड मिलर, वेन पार्नेल, केशव महाराज, कगिसो रबाडा, एन्रिक नॉर्किए, तबरेझ शम्सी,
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
‘टी-20 हा फलंदाजांचा खेळ’, भारताविरुद्धची मालिका सुरू होण्याआधी आफ्रिकी गोलंदाजांचे मोठे विधान
भारताविरुद्धच्या टी-20 मालिकेविषयी दक्षिण आफ्रिकी कर्णधाराचे मोठे विधान, पाहा काय म्हणाला बावुमा