हरारे| झिम्बाब्वे विरुद्ध भारत संघात शनिवारी (२० ऑगस्ट) वनडे मालिकेतील दुसरा सामना होणार आहे. हा सामना जिंकत भारतीय संघाकडे २-० च्या फरकाने वनडे मालिका खिशात घालण्याची संधी आहे. तर झिम्बाब्वेचा संघ मालिका वाचवण्यासाठी आपला पूर्ण जोर लावताना दिसेल. भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी १२.४५ वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे.
तत्पूर्वी या सामन्यासाठी नाणेफेक झाली असून भारतीय संघाने पुन्हा एकदा नाणेफेकीत बाजी मारली आहे. कर्णधार केएल राहुल याने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे.
Captain KL Rahul wins the toss and we will bowl first in the 2nd ODI.
Live – https://t.co/RDdvga1BXI #ZIMvIND pic.twitter.com/7vF1riOxD9
— BCCI (@BCCI) August 20, 2022
भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये एक महत्त्वपूर्ण बदल करण्यात आला आहे. वेगवान गोलंदाज आणि पहिल्या वनडे सामन्यातील सामनावीर दीपक चाहर याला बाहेर बसवण्यात आले आहे. त्याच्याजागी शार्दुल ठाकूरचे संघात पुनरागमन झाले आहे. तसेच झिम्बाब्वे संघातही २ बदल करण्यात आले आहेत. फलंदाज ताकुडझ्वानाशे कैटानो आणि गोलंदाज तनाका चिवांगा यांना प्लेइंग इलेव्हनमध्ये जागा देण्यात आली आहे.
असे आहेत दोन्हीही संघ-
भारतीय संघ-
शिखर धवन, शुबमन गिल, इशान किशन, केएल राहुल (कर्णधार), दीपक हुडा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, प्रसिध कृष्णा, मोहम्मद सिराज
झिम्बाब्वे संघ-
इनोसंट कैया, ताकुडझ्वानाशे कैटानो, वेस्ली मधेवेरे, शॉन विल्यम्स, सिकंदर रझा, रेगिस चाकाब्वा (यष्टीरक्षक/कर्णधार), रायन बर्ल, ल्यूक जोंगवे, ब्रॅड इव्हान्स, व्हिक्टर न्याउची, तनाका चिवांगा
महास्पोर्ट्सच्या व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
कौतुक करावे तितके कमीच! झिम्बाब्वे बोर्डाने भारताविरुद्धची दुसरी वनडे ‘या’ लोकांना केलीय समर्पित
आताची लहान पोरंही फाडफाड इंग्लिश बोलतात! तोडक्यामोडक्या इंग्रजीमुळे आझमचं होतंय हसू, तुम्हीही पाहा
संगत का असर! पुजाराच्या साथीदाराचे द्विशतक, ११ षटकार आणि १८ चौकारांसह केली मॅरेथॉन खेळी






