टी२० मालिकेनंतर आता इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यात ३ सामन्यांची वनडे मालिका होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना केनिंग्टन ओव्हल, लंडन येथे मंगळवारी (१२ जुलै) खेळला जाणार आहे. भारतीय संघ टी२० मालिकेनंतर वनडे मालिकेतही आपली विजयी पताका फडकवण्यासाठी प्रयत्नशील असेल. तर इंग्लंडचा संघ टी२० मालिकेतील पराभवाचा वचपा काढण्याच्या इराद्याने मैदानावर उतरेल.
तत्पूर्वी भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी ५ वाजता सामन्यासाठी नाणेफेक झाली आहे. भारताचा कर्णधार रोहित शर्मा याने नाणेफेक जिंकली असून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे.
???? Toss Update ????#TeamIndia have elected to bowl against England in the first #ENGvIND ODI.
Follow the match ▶️ https://t.co/8E3nGmlNOh pic.twitter.com/8xh9xJdWxs
— BCCI (@BCCI) July 12, 2022
भारताकडून सध्या खराब फॉर्मशी झगडत असलेला विराट कोहली याला संघाबाहेर ठेवण्यात आले आहे. तो ग्रोइनच्या दुखापतीमुळे या सामन्यात खेळू शकणार नाही. त्याच्याजागी तिसऱ्या क्रमांकावर श्रेयस अय्यरला प्लेइंग इलेव्हनमध्ये सहभागी केले आहे. तसेच अर्शदीप सिंग यालाही उजव्या ओटीपोटात वेदना होत असल्यानेही तो देखील पहिल्या सामन्याचा भाग नाहीय.
???? UPDATE: Virat Kohli and Arshdeep Singh were not considered for selection for the first ODI against England.
Virat has a mild groin strain while Arshdeep has right abdominal strain. The BCCI Medical Team is monitoring them.#TeamIndia | #ENGvIND
— BCCI (@BCCI) July 12, 2022
असे आहेत दोन्हीही संघ-
भारत: रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, रविंद्र जडेजा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, युझवेंद्र चहल, प्रसिद्ध कृष्णा
इंग्लंड: जेसन रॉय, जॉनी बेअरस्टो, जो रूट, बेन स्टोक्स, जोस बटलर (कर्णधार/यष्टीरक्षक), लियाम लिविंगस्टोन, मोईन अली, क्रेग ओव्हरटन, डेव्हिड विली, ब्रायडन कार्स, रीस टोप्ले
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
ऑस्ट्रेलियाचा घमंड भारताने वेळोवेळी तोडलाय..! India vs Australia रायवलरीचे किस्से
शिवसैनिकांनी जेव्हा खोदून टाकलेलं वानखेडेचं पिच; वाचा शिवसेनेचे क्रिकेटच्या मैदानावरही गाजलेले वाद
मालिका तर जिंकायचीच आहे, पण ‘हा’ पराक्रम करत इतिहास रचण्याच्या प्रयत्नात असेल रोहित






