पॅरिस ऑलिम्पिक (Paris Olympic) नुकतेच संपले. भारताच्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली. या ऑलिम्पिकमध्ये भारताला एकूण 6 पदकं मिळवता आली. पण भारतीय महिला कुस्तीपटू विनेश फोगटनं देखील चमकदार कामगिरी केली होती, तिला अंतिम सामन्यात 100 ग्रॅम जास्त वजनामुळे अपात्र ठरवण्यात आले. त्यानंतर तिनं रौप्य पदकासाठी सीएएकडे अपील केली होती. पण सीएएनं (14 ऑगस्ट) रोजी हा निर्णय फेटाळला. त्यावर आता विनेशचे प्रशिक्षक वोलार अकोसनं मोठं वक्तव्य केलं आहे.
विनेश फोगटचे (Vinesh Phogat) प्रशिक्षक वोलार अकोस यांनी फेसबुकवर पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी लिहिलं की, विनेशने सुमारे साडेपाच तास वजन कमी करण्याचा प्रयत्न केला, पण ती यशस्वी होऊ शकली नाही. यानंतर मला वाटले की ती कुठेतरी मरेल. पण अकोसने नंतर ही पोस्ट डिलीट केली. उपांत्य फेरीनंतर विनेशचे वजन 2.7 किलो अधिक असल्याचं त्यानं आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे. आम्ही एक तास वीस मिनिटे व्यायाम केला, पण तरीही 1.5 किलो वजन राहिले.
अकोसने पुढे सांगितलं की, आमच्याकडे कोणताही पर्याय नव्हता, आम्ही मध्यरात्री ते पहाटे साडेपाचपर्यंत खूप मेहनत केली. विनेश वेगवेगळ्या कार्डिओ मशीनवर काम करत राहिली, जेणेकरून तिचे वजन कमी करता येईल. तासाभरात ती फक्त 2-3 मिनिटेच विश्रांती घेत होती, त्यानंतर ती पडली, पण कसे तरी आम्ही तिला उचलले. “मी मुद्दाम नाट्यमय तपशील लिहित नाही, परंतु मला फक्त आठवते की ती मरण पावली असती,”
महत्त्वाच्या बातम्या-
द्रविडचा मुलगा समितचे महाराजा ट्रॉफीमध्ये पदार्पण, पहिल्या सामन्यात कशी राहिली कामगिरी?
कोहली-बाबर नाही, तर ‘हा’ खेळाडू टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा बादशाह!
पुजारासाठी टीम इंडियाचे दरवाजे नेहमीसाठी बंद? माजी क्रिकेटर म्हणाला, “गंभीर असतानाही…”