---Advertisement---

आयपीएल खेळण्यापूर्वी भारताच्या या खेळाडूने उरकून घेतला साखरपुडा

On: शनिवार, ऑगस्ट 22, 2020 11:00 AM
---Advertisement---

मुंबई । भारताचा अष्टपैलू खेळाडू विजय शंकर याने सोशल मीडियावर त्याचा साखरपुडा झाला असल्याची बातमी आपल्या चाहत्यांना दिली आहे. मागील वर्षी इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वचषकात तो संघात सहभागी होता.

भारतीय अष्टपैलू विजय शंकर आयपीएल खेळण्यासाठी  सनरायझर्स हैदराबादसमवेत युएईला जाणार आहे. त्यापूर्वी त्याने साखरपुडा उरकून घेतला.

विजय शंकरने त्याची होणारी पत्नी वैशाली विश्ववेश्वरनबरोबरचे फोटो शेअर केले आहेत. एका फोटोत वैशाली एका लेहेंगामध्ये दिसते, तर दुसऱ्या फोटोत दोघेही पारंपारिक वेषभूषेत दिसत अाहे.

https://www.instagram.com/p/CEHdQA-Didr/?igshid=u7rb1ziea8xs

आयुष्यातील या नवीन सुरूवातीबद्दल शंकरला भारतीय खेळाडूंकडून अभिनंदनाचे संदेश आले. दिनेश कार्तिक, युवजवेंद्र चहल, केएल राहुल आणि श्रेयस अय्यर खेळाडूंनी शंकरचे अभिनंदन केले.

2018 मध्ये कोलंबो येथे श्रीलंकेविरूद्ध विजय शंकरने टी 20 क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते, तर एक वर्षानंतर त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण केले.

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---