भारतीय क्रिकेटमधून मोठी बातमी पुढे येत आहे. सध्या भारतामध्ये दुलीप ट्रॉफी स्पर्धा सुरू आहे. यामध्ये अनेकांनी कौतुकास्पद कामगिरी केली आहे. मात्र या आनंदावर विरजण घालणारी घटना घडली आहे. भारताचा अष्टपैलू खेळाडू वेंकटेश अय्यर याला दुखापतीमुळे मैदान सोडावे लागले आहे. त्याची ही दुखापत एवढी गंभीर होती की स्टेडियमध्ये ऍम्ब्युलन्सला बोलवावे लागले.
झाले असे की, वेंकटेश अय्यर (Venkatesh Iyer) हा दुलीप ट्रॉफीमध्ये सेंट्रल झोनकडून खेळत आहे. तो फलंदाजी करत असताना गोलंदाज चिंतन गाजाने केल्या थ्रोमुळे तो जखमी झाला आहे.
दुलीप ट्रॉफी 2022ची पहिली उपांत्य फेरी सेंंट्रल झोन विरुद्ध वेस्ट झोन यांच्यात कोयम्बतूर येथे सुरू आहे. या सामन्याचा शुक्रवारी (16 सप्टेंबर) दुसरा दिवस आहे. यामध्ये सेंट्रलने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यावेळी प्रथम फलंदाजी करताने वेस्ट झोनने 257 धावा केल्या.
दुसऱ्या दिवशीच्या दुसऱ्या सत्रात ही घटना घडली. चिंतन गाजा याने केलेल्या थ्रो थेट वेंकटेश अय्यर याच्या डोक्याला लागला. यामुळे तो ताबडतोब रिटायर्ड हर्ट झाला. तर काही रिपोर्टनुसार, हा थ्रो फलंदाजाच्या हेल्मेटखाली मानेला लागला असल्याचे पुढे येत आहे. याआधी वेंकटेशने चिंतनच्या गोलंदाजीवर षटकार ठोकला होता. यावर गोलंदाजांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती.
मध्यमगती वेगवान गोलंदाज चिंतन हा वेंकटेशने षटकार मारल्याने निराश होता. तर त्याच्या पुढच्याच चेंडूवर वेंकटेशने बचावात्मक पवित्रा घेतला त्याचवेळी चिंतनने तो चेंडू उटलला आणि फलंदाजाच्या दिशेने फेकला. त्याने जर त्याची नाराजी हा थ्रो करत व्यक्त केली असेल तर हे चुकीचे आहे. तसेच चेंडू लागल्याने वेंकटेश लगेचच जमिनीवर पडला. त्याला मैदानाबाहेर घेऊन जाण्यासाठी ऍम्ब्युलन्सला आली मात्र तो स्वतच मैदानाबाहेर चालत गेला. नंतर तो फलंदाजीसाठी आला मात्र त्याने क्षेत्ररक्षण केले नाही.
Unpleasant scene here. Venkatesh Iyer has been hit on the shoulder as Gaja throws the ball defended ball back at the batter. Venkatesh is down on the ground in pain and the ambulance arrives. #DuleepTrophy pic.twitter.com/TCvWbdgXFp
— Dhruva Prasad (@DhruvaPrasad9) September 16, 2022
या सामन्यात वेंकटेशने 9 चेंडूत 2 चौकार आणि 1 षटकाराच्या सहाय्याने 14 धावा केल्या. तर सेंट्रल पहिल्या डावात 128 धावांवरच गारद झाला. वेस्ट झोनचा दुसरा डाव सुरू झाला असता त्यांनी 3 विकेट्स गमावत 107 धावा केल्या आहेत.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पंजाब किंग्जला मिळाला विश्वविजेता प्रशिक्षक, आयपीएल ट्रॉफीही केलीये नावावर
पाकिस्तानमध्ये पोहोचताच इंग्लंडने दाखवला मनाचा मोठेपणा, पूरग्रस्तांसाठी मदत जाहीर
ब्रेकिंग! सॅमसन बनला भारताचा कर्णधार, न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी मिळाली जबाबदारी






