येत्या १८ ते २२ जून दरम्यान भारत आणि न्यूझीलंड यांच्यात विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना साऊथॅम्पटन येथे खेळवण्यात येणार आहे. या सामन्यानंतर भारतीय संघाला इंग्लंडमध्येच इंग्लंड संघाविरुद्ध ५ कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे. या मालिकेसाठी रवींद्र जडेजाला देखील भारतीय संघात संधी देण्यात आली आहे.
इंग्लंडला रवाना होण्यापूर्वी हे खेळाडू मुंबईत १४ दिवस विलगिकरणात राहणार आहेत. त्यानंतर २ जूनला भारतीय संघ इंग्लंडला रवाना होणार आहे. तत्पूर्वी रवींद्र जडेजाने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर काही फोटो शेअर करत जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.
गेली अनेक वर्षे रवींद्र जडेजा आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्ज संघाचे प्रतिनिधित्व करत आहे. त्यामुळे एमएस धोनी आणि त्याची मैत्री खूप घट्ट आहे. त्याने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर पूर्वीच्या इंग्लंड दौऱ्यावरील धोनी सोबतचे काही जुने फोटोज् शेअर केले आहेत. ज्यावर त्याने कॅप्शन म्हणून, “कॅप्शन तुम्हीच सुचवा” असे लिहिले आहे. या फोटोवर चाहते देखील आपल्या प्रतिक्रीया देत आहेत.
Imagine your own caption 🤔 #throwback #englandtour pic.twitter.com/lzGqkV9GVG
— Ravindrasinh jadeja (@imjadeja) May 26, 2021
धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने इंग्लंडमध्ये ६ कसोटी सामने खेळले आहेत. यात त्यांना एकच कसोटी सामन्यात विजय मिळवण्यात यश आले होते. तर चार सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. २०११ मध्ये जेव्हा भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर गेला होता. तेव्हा संघात दिग्गज खेळाडू असताना देखील भारतीय संघाला ४-० ने पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर २०१४ मध्ये भारतीय संघाला एक सामना जिंकण्यात यश आले होते.
जेव्हापासून विराट कोहलीला भारतीय संघाचे कर्णधारपद देण्यात आले आहे. तेव्हापासून भारतीय संघाने तीनही प्रकारामध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे. विराट कोहली हा एकमेव भारतीय कर्णधार आहे. ज्याने दोन वेळेस ऑस्ट्रेलियन संघाला, ऑस्ट्रेलियामध्ये जाऊन पराभूत केले आहे. विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत देखील विराट कोहलीकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे. तसेच विराटकडे, कर्णधार म्हणून पहिली आयसीसीची ट्रॉफी जिंकण्याची देखील संधी असणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
तयारी कसोटी चॅम्पियनशीप पटकावण्याची! पाहा खेळाडू क्वारंटाईनमध्ये कशी घेतायेत तंदुरुस्तीची काळजी
बालपणीच्या शाळेतील शिक्षकाला लैंगिक अत्याचाराच्या प्रकारांत अटक होताच अश्विनने केले ‘असे’ ट्विट