भारत विरुद्ध श्रीलंका दुसऱ्या कसोटी सामन्याचा पहिला दिवस हा भारतीय फलंदाजांनी गाजवला. २ खेळाडूंनी शतके तर एका खेळाडूने अर्धशतक केले. याबरोबर असंख्य विक्रमही पहिल्या दिवशी झाले.
त्यातील टॉप- १७ ठळक विक्रम
#१ केएल राहुलने सलग ६ डावात ६ अर्धशतके करून गुंडाप्पा विश्वनाथ आणि राहुल द्रविड यांच्या विक्रमाशी बरोबरी केली.
#२ ५०व्या कसोटीमध्ये ४००० धावा पूर्ण करणारा पुजारा ५वा फलंदाज ठरला.
#३ ४००० कसोटी धावा करण्यासाठी सर्वात कमी डाव खेळणाऱ्या फलंदाजांच्या यादीत पुजारा द्रविडसह तिसऱ्या क्रमांकावर, यापूर्वी सुनील गावसकर (८१ डाव ) आणि वीरेंदर सेहवाग (८१ डाव) यांनी हा विक्रम केला आहे. पुजारा आणि द्रविडला ८४ डाव लागले.
#४ ५० कसोटीमध्ये सार्वधिक धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीत पुजारा चौथ्या स्थानी. गावसकर (४९४७), द्रविड(४१३५), सेहवाग(४१०३) आणि पुजारा (४०९४) यांनी यापूर्वी ५० कसोटीमध्ये भटकडून ४००० किंवा त्यापेक्षा जास्त धावा केल्या आहेत.
#५ पुजारा ४००० धावा करणारा १५वा भारतीय खेळाडू असून ५० पेक्षा जास्तच्या सरासरीने हा विक्रम करणारा केवळ ६वा भारतीय खेळाडू.
#६ राहुल द्रविड आणि चेतेश्वर पुजारा या दोनही खेळाडूंनी त्याच्या ४००० धावा ह्या ८४ कसोटी डावात पूर्ण केल्या आहेत.
#७ ५०व्या कसोटीमध्ये शतक करणारा पुजारा हा उम्रीगर, गुंडाप्पा विश्वनाथ, गावसकर, कपिल देव, व्हीव्हीएस लक्ष्मण आणि विराट कोहली यांच्यानंतरचा केवळ ८वा भारतीय फलंदाज.
#८ चेतेश्वर पुजाराच्या शेवटच्या १२ कसोटी डावांची आकडेवारी: १२४, ११९, ५१, ४७, १६, ८३, ६, १७, २०२, ५७, १५३ आणि १२८*
#९ ५ डावात पुजाराची ही श्रीलंकेतील ३री शतकी खेळी.
#१० कसोटीमध्ये १३ शतकांसाठी कमी डाव खेळणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीत पुजारा ४था. गावसकर(६८), विराट कोहली (८१), सचिन तेंडुलकर(८२) आणि चेतेश्वर पुजारा (८४)
#११ सर्वात कमी डावात श्रीलंकेत ३ शतके करणाऱ्या खेळाडूत पुजारा अव्वल. पुजारा (५ डाव), सचिन (५ डाव) आणि लारा (७ डाव )
#१२ रहाणेच शतक हे भारतीय फलंदाजाने या मालिकेत केलेलं ५व शतक
#१३ परदेशात रहाणेची ही ६वी शतकी खेळी.
#१४ ५० किंवा त्यापेक्षा जास्त कसोटी सामने खेळणारा पुजारा ३१वा भारतीय खेळाडू
#१५ पुजारा यावर्षी कसोटीमध्ये सर्वाधीक धावा करणारा खेळाडू, पुजारा (८३८), डीन एल्गर(७६२), स्टिव्ह स्मिथ (५८२)
#१६ तीन कसोटी सामन्यांत ३ शतके श्रीलंकेत पुजाराच्या नावावर, या तीन कसोटीमध्ये त्याने ५ डावात ही कामगिरी केली, हाही एक विक्रम.
#१७ पुजाराने यापूर्वी केवळ २ वेळा वर्षात कसोटीमध्ये २ षटकार खेचले होते. २०१०(०), २०११(०), २०१२(१), २०१३(१), २०१४(१), २०१५(२), २०१६(२) आणि २०१७(२)